नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : कोरोना अनेक दिग्गज अर्थव्यवस्थांना हादरुन सोडले आहे. त्यानंतर रशिया-युक्रेन (Russia -Ukraine War) यांच्यातील गेल्या एका वर्षाच्या युद्धाने जगाला वेठीला धरले आहेत. निसर्गचक्र बिघडल्याने अनेक देश हातघाईवर आले आहे. भाजीपाल्यासह धान्य महागले. या देशात महागाईने कळस गाठला आहे. काही देशात राहायला जाणे सोडा, फिरायला जाणे सुद्धा संकट आहे. या देशातील महागाई तुमचा खिसा कापल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे फिरण्याच्या आनंदावर विरजण पडू शकते. तुम्हाला वाटत असेल की भारत महागड्या देशांच्या (Expensive Country) यादीत सर्वात पुढे असेल, पण यादीवर नजर टाकल्यास तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसेल.
हा देश महागडा
गेल्या अनेक दिवसांपासून भारत सोडून परदेशात राहण्याचा ट्रेंड वाढला आहे. जगातील अनेक देश इतके महाग आहेत की, तिथे राहणे सोप्प नाही. अनेक लोकांना वाटते की, जगातील सर्वात महागडे देश अमेरिका आणि ब्रिटन आहेत. पण ही गोष्ट सत्य नाही. रिपोर्टनुसार, जगातील सर्वात महागडा देश बर्म्युडा आहे. टॉप-10 यादीत इतर कोणते देश आहेत माहिती आहे का?
महागडे देश कोणते
वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सने (World of Statistics) सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्विटरवर जगातील महागड्या देशांची माहिती दिली आहे. टॉप-10 महागड्या देशांमध्ये बर्म्युडा, स्वित्झर्लंड, कॅमेन आयलँड, बहामास, आईसलँड, सिंगापूर, बारबोडास, नॉर्वे, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक आहे.
कुठे आहे देश
वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, बर्म्युडा जगातील सर्वात महागडा देश आहे. उत्तर अटलांटिक महासागारातील ते एक बेट आहे. या यादीतील 140 देशांपैकी येथील राहण्याचा खर्च, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वात जास्त आहे.
हा आईसलँड महाग
तर महागड्या देशात तिसऱ्या स्थानावर केयमन आईसलँड (Cayman Islands) आहे. या देशात प्रत्येक महिन्याला, खाणे-पिणे, कपडे, औषधोपचार, मनोरंजन, दळणवळण आणि इतर खर्च मिळून महिन्याला एक लाख रुपयांहून अधिकचा खर्च येतो. चौथ्या आणि त्यानंतरच्या क्रमांकावर इस्त्राईल हा देश आहे. या देशात महागाईने कळस गाठला आहे. येथे राहणे सर्वाधिक खर्चिक आहे.
सर्वात शेवटी कोण
या यादीत 9व्या आणि 10व्या क्रमांकावर डेनमार्क आणि बारबाडोस हे दोन देश आहेत. येथे राहणेच नाही तर दैंनदिन जीवनातील वस्तू पण महाग आहे. या देशात दळणवळणासाठी अधिक खर्च करावा लागतो. जगातील महागड्या देशांची यादी दरवर्षी बदलते. त्यात उलटफेर होतो. पण बर्म्युडा, स्वित्झर्लंड आणि डेनमार्कसारखे देश या यादीतून बाहेर पडत नाहीत.
भारताचा क्रमांक कितवा
वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्स नुसार, भारत आणि पाकिस्तान जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक आहे. या यादीत पाकिस्तानचा क्रमांक 140 वा तर भारताचा क्रमांक 138 वा आहे.