नवी दिल्ली – देशामध्ये महागाई आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. येणाऱ्या काळात नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसू शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने काही प्रमाणात इंधनाचे दर कमी झाले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर भडकण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर वाढल्यास सर्व वस्तूंची किमंत वाढते. त्यामुळे येणाऱ्या काळात महागाई आणी वाढू शकते.
वाढती महागाई ही केवळ एकट्या भारताचीच समस्या नसून, अमेरिका, चीन आणि जपान सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे देखील महागाईने कंबरडे मोडले आहे. जपानमध्ये गेल्या काही महिन्यात महागाई उच्चा पातळीवर पोहोचली आहे. माहागाई नियंत्रणात आणून अर्थव्यवस्था बळकट बनवण्यासाठी जपान सरकारकडून 490 अब्ज डॉलर (56 ट्रिलियन येन) च्या प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतून डबघाईस आलेल्या उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवले जाणार आहे. तसेच अमेरिकेकडून देखील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत.
भरताबाबत बोलायचे झाल्यास भारताची मध्यवर्ती बँक असलेली आरबीआय आणि केंद्राकडून महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपययोजना आखण्यात येत आहेत. उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. मध्यंतरी खाद्य तेलाच्या किमतीमध्ये व्रिकमी वाढ झाली होती. परंतु त्यावरील शुल्क देखील कमी करण्यात आल्याने त्याच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.
संबंधित बातम्या
ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयचे मोठे पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय