नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही मोठी अपडेट समोर आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना या 31 डिसेंबरपूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यांना स्टॉक खरेदी आणि विक्री करण्यासाठी हे काम करणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना बाजारातील व्यवहार पूर्ण करता येणार नाही. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पण डीमॅट खातेधारकांना ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत असेल. या अगोदरच गुंतवणूकदारांना त्यांच्या वारसाचे नाव खात्यात अपडेट करावे लागेल. असे केले नाही तर त्यांना खाते हाताळताना अडचण येईल.
वारसाचे नाव न जोडल्यास काय होईल?
Mutual Fund मध्ये गुंतवणूक आणि स्टॉकमध्ये शेअर खरेदी-विक्री करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनी जोडणे आवश्यक आहे. सेबीने याविषयीचे निर्देश दिले आहे. नाहीतर सेबी व्यवहारावर रोख लावेल. म्युच्युअल फंड खात्यात वारसाचे नाव न जोडल्यास खातेदाराला फंड, रक्कम काढता येणार नाही. तसेच नवीन फंड निवडणे आणि त्यात गुंतवणूक करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ज्यांनी वारसदाराचे नाव जोडले नाही. त्यांना अडचण येऊ शकते.
का जोडावे वारसाचे नाव
बिझनेस टुडेच्या नावानुसार, वारसाचे नाव जोडल्यास अनेक अडचणी दूर होतील. त्यासाठी जास्त कागदपत्रे देण्याची गरज नाही. त्यामुळे कायदेशीर अडचणी येणार नाहीत. तर फंड ट्रान्सफर आणि गुंतवणूक करणे सोपे होईल. वारसाचे नाव जोडल्यास भविष्यात खातेदाराच्या नंतर त्याच्या वारसाला रक्कम मिळण्यात अडचण येणार नाही. वारसदाराचे नाव न जोडल्यास खात्यातील गुंतवणूक आणि रक्कम काढण्यासाठी दीर्घ प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते.
कसे जोडणार वारसाचे नाव
वारसदाराचे नाव ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने जोडता येते. तुम्ही ज्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करत आहात, त्यावर ऑनलाईन पद्धतीने नाव जोडणी करा. या प्रक्रियेत एकूण 15 मिनिटांचा वेळ लागू शकतो. एक व्यक्ती एकूण 3 वारसदारांची नावे जोडू शकतो. वारसाचे नाव जोडल्यानंतर कोणत्याही अडचणीशिवाय गुंतवणूकदाराला शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येईल.