Investment tips Start SIP : शेअर बाजारात (Share Market) सध्या तेजी असली तरी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचं प्रमाण सध्या वाढत असल्याचं दिसतंय. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकड्यांनुसार, मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात (Equity mutual funds) तब्बल 10 हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक झाली. दुसरीकडे गुंतवणूकदारांचा नियोजित गुंतवणूक अर्थात SIP मध्येही गुंतवणूक करण्याकडे ओढा असल्याचं दिसत आहे. SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वात सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जातो. जर तुम्हाला दीर्घकाळात गुंतवणूक करायची असेल तर SIP आताच सुरु करणे आवश्क आहे. (Investment tips in Marathi Start SIP 5 best scheme where money can become double)
मे महिन्यात SIP मध्ये 8819 कोटी रुपये गुंतवणूक झाली. गुंतवणूकदारांची संख्याही वाढून मेअखेर 3.85 कोटी इतकी झाली. एप्रिलपर्यंत गुंतवणूकदारांची संख्या 3.76 कोटी इतकी होती. त्यावरुन गुंतवणूकदारांचा SIP कडे कल वाढत असल्याचं दिसतंय.
देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. याशिवाय लसीकरणाचाही वेग वाढला आहे. त्यामुळे हे खुल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत आहेत. लघुस्थिती सुधारल्यास अर्थव्यवस्थेला गती येईल, कंपन्यांना चालना मिळेल, ज्याचा फायदा शेअर बाजारात पाहायला मिळेल, असं अर्थतज्ज्ञ सांगतात.
अशा परिस्थितीत SIP मध्ये गुंतवणूक करणे योग्य पर्याय आहे. एकत्र पैसे गुंतवून ब्लॉक करण्याऐवजी महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याचा पर्याय इथे उपलब्ध असतो. शिवाय आवश्यकतेनुसार गुंतवणुकीची रक्कम कमी-जास्त करु शकता. सध्या SIP सुरु करण्याची योग्य वेळ असल्याचं तज्ज्ञ सांगतात, जुने गुंतवणूकदार SIP टॉपअपचा पर्याय स्वीकारु शकतात.
कोटक स्मॉलकॅप फंड
पाच वर्षातील SIP रिटर्न : 27 %
5 हजार महिना गुंतवणुकीची रक्कम : 6 लाख
कमीत कमी SIP : महिना 1 हजार रुपये
संपत्ती – 4294 कोटी
Axis मिडकॅप फंड
पाच वर्षातील SIP रिटर्न : 24 %
5 हजार महिना गुंतवणुकीची रक्कम : 5.4 लाख
कमीत कमी SIP : महिना 500 रुपये
एकूण संपत्ती : 11834 कोटी
मिरे एसेट इमर्जिंग ब्लूचिप
पाच वर्षातील SIP रिटर्न : 23.5 %
5 हजार महिना गुंतवणुकीची रक्कम : 5.3 लाख
कमीत कमी SIP : महिना 1 हजार रुपये
एकूण संपत्ती : 17892 कोटी
BOI AXA टॅक्स बचत
पाच वर्षातील SIP रिटर्न : 23 %
5 हजार महिना गुंतवणुकीची रक्कम : 5.26 लाख
कमीत कमी SIP : महिना 500 रुपये
एकूण संपत्ती : 453 कोटी
HDFC स्मॉल कॅप
पाच वर्षातील SIP रिटर्न : 21%
5 हजार महिना गुंतवणुकीची रक्कम : 5लाख
कमीत कमी SIP : महिना 500 रुपये
एकूण संपत्ती : 11574 कोटी
(कोणत्याही गुंतवणुकीप्रीव तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)
संबंधित बातम्या
सरकारी कर्मचारी मालामाल, 1 जुलैपासून मोठी पगारवाढ, महिन्याचा पगार किती हजारांनी वाढणार?
(Investment tips in Marathi Start SIP 5 best scheme where money can become double)