IRCTC : रेल्वे तिकीट रद्द केल्यास तात्काळ रिफंड मिळणार, आयआरसीटीसीकडून iPay पेमेंट गेटवे लाँच

| Updated on: Sep 15, 2021 | 3:12 PM

अनेकदा तिकीट रद्द केल्यानंतर आपल्याला उशिरा पैसे परत मिळतात. कधीकधी यासाठी तीन दिवसही लागतात. मात्र, रेल्वेने आयपे सेवा सुरु केली आहे. या सेवेअंतर्गत तात्काळ तिकिटाची रक्कम मिळेल.

IRCTC : रेल्वे तिकीट रद्द केल्यास तात्काळ रिफंड मिळणार, आयआरसीटीसीकडून iPay पेमेंट गेटवे लाँच
आयपे गेटवे म्हणजे काय? ज्यामध्ये तिकीट रद्द केल्यास लगेच मिळतात पैसे?
Follow us on

नवी दिल्ली: रेल्वेने आपल्याला अनेकदा प्रवास करावा लागतो. जर लांबचा प्रवास करायचा असेल तर काही दिवस अगोदर आरक्षण  करणं चांगलं असतं. तिकीट बुक करण्यासाठी आता रेल्वे स्टेशनवर जाण्याचीही गरज लागत नाही. IRCTC च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कुठेही आरक्षण करू शकता. पण अनेकदा असेही घडते की तुमचे तिकीट वेटिंगवर राहतं आणि चार्ट तयार केला जातो. अशावेळी वेटिंग लिस्टमधील तिकीट अवैध होते आणि काही दिवसानंतर तुमचे पैसे परत केले जातात. कधीकधी असे होते की तुमचा प्रवास प्लॅन रद्द होतो, अशावेळी तुम्हाला तिकीट रद्द करावे लागतं.

आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवरून वेळेवर तिकीट रद्द केले गेले, तर किरकोळ रक्कम वजा केल्यानंतर सर्व पैसे परत केले जातात. रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही जितके जास्त वेळ तिकीट रद्द करण्यास विलंब कराल तितके जास्त पैसे कापले जातात. अनेकदा तिकीट रद्द केल्यानंतर आपल्याला उशिरा पैसे परत मिळतात. कधीकधी यासाठी तीन दिवसही लागतात. मात्र, रेल्वेने आयपे सेवा सुरु केली आहे. या सेवेअंतर्गत तात्काळ तिकिटाची रक्कम मिळेल.

iPay सेवा म्हणजे काय?

IRCTC ने iPay IRCTC नावाची नवीन सेवा सुरू केली आहे. याचा वापर केल्यास तिकीट बुकिंग खूप कमी वेळात होईल. तसेच, तिकीट रद्द केल्यावर, त्यांना रिफंडसाठी वाट पाहावी लागणार नाही.IRCTC ने यूजर इंटरफेस अपग्रेड केला आहे आणि नवीन पेमेंट गेटवे iPay ची सुरुवात केली आहे.

रिफंड लगेच मिळणार

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी तिकीट रद्द करण्यापेक्षा रिफंड मिळवण्यासाठी जास्त वेळ लागत असे. पण, आता रिफंडचे पैसे लगेच मिळतील. आयआरसीटीसीच्या अ‌ॅपच्या यूजरला त्याच्या UPI बँक खाते किंवा डेबिट कार्ड इत्यादीसाठी फक्त एकदाच नोंदणी करावी द्यावा लागेल. त्यानंतर पेमेंट इन्स्ट्रुमेंट सेव्ह केले जाईल आणि पुढील व्यवहारांसाठी अधिकृत केले जाईल.

IRCTC चे स्वतःचे पेमेंट गेटवे

आयआरसीटीसीच्या मते यापूर्वी कंपनीकडे स्वतःचे पेमेंट गेटवे नव्हते, परंतु आता आय-पेच्या स्वरूपात त्याचे स्वतःचे पेमेंट गेटवे आहे. अनेकदा लोकांना गुगल पे, रेझर पे, पेटीएम सारखे इतर पेमेंट गेटवे वापरावे लागतात. याला जास्त वेळही लागत असे. तिकिट रद्द केल्यानंतर मिळणारा रिफंड आता तातडीनं मिळेल. IICTC चा iPay पेमेंट गेटवे पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

IRCTC iPay द्वारे तिकीट कसे बुक करावे

  1. सर्वप्रथम www.irctc.co.in वर लॉग इन करा.
  2. कुठून कुठे प्रवास करायचा, तेच तपशील भरा.
  3. आता तुमच्या सोयीनुसार ट्रेन निवडा आणि प्रवाशाचा तपशील भरा.
  4. आता बुकिंग करताना, प्रथम पेमेंटसाठी ‘IRCTC iPay’ हा पर्याय निवडा.
  5. पेमेंटसाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय इत्यादी तपशील भरा.
  6. ओके केल्यावर लगेच तुमचे तिकीट बुक केले जाईल. तुम्हाला एसएमएस आणि ईमेल वर तिकीट देखील मिळेल.
  7. विशेष गोष्ट म्हणजे हा पर्याय सेव्ह केल्यानंतर, पुढच्या वेळी तुम्ही पुन्हा तिकीट बुक कराल तेव्हा तुम्हाला पेमेंटचे तपशील भरावे लागणार नाहीत.
  8. आपण त्वरितपैसे देऊन तिकिटे बुक करू शकाल. विशेषत: तात्काळ तिकिटांच्या बुकिंगमध्ये तुम्हाला यातून आराम मिळेल.

इतर बातम्या:

एअरटेल, व्होडाफोन आयडियाला अच्छे दिन, कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी, केंद्राकडून दूरसंचार क्षेत्रासाठी पॅकेज मंजूर, सूत्रांची माहिती

स्पाईसजेटची मोठी घोषणा, 38 नव्या मार्गांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट सुरु करणार

irctc started Ipay payment get way for quick refund after cancel ticket booking online