नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडिया आता ऑनलाईन माध्यमातून आपल्या ग्राहकांना अनेक सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. आताही तुम्ही बँकेतून घेतलेल्या अर्जाच्या फॉर्मद्वारे तुमचे बँक खाते उघडू शकता. माहितीच्या अभावामुळे अनेक लोक बँकेच्या शाखेला भेट देतात, ज्यामध्ये पासबुक छापून घेणाऱ्यांची संख्याही मोठी असते. मात्र, पासबुक प्रिंटिंग मशीन बँकेत चालू नसल्याची तक्रार हे लोक अनेकदा करतात.
बँक कर्मचाऱ्यांकडून अनेकदा माहिती दिली जाते की, मशीन बिघाडामुळे पासबुक प्रिंटची सुविधा दिली जात नाही. अनेक बँकांमध्ये स्वयंचलित पासबुक प्रिंटिंग मशीन बसवण्यात आलीत, जिथून तुम्ही तुमचे पासबुक छापू शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाईन माध्यमातून तुमचे स्टेटमेंट डाऊनलोड करू शकता. परंतु जर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून स्टेटमेंट घेता येत नसेल आणि पासबुक प्रिंटिंग मशीन सदोष असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.
जर तुमच्या बँकेत पासबुक प्रिंटिंग मशीनदेखील खराब असेल, तर तुम्ही ऑनलाईन माध्यमातून त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. यानंतर बँकेकडून समस्या सोडवली जाईल. जर तुम्हाला पासबुक प्रिंटिंग मशीनबद्दल तक्रार करायची असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार करू शकता. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘कृपया आपली तक्रार दिलेल्या लिंकमध्ये दिलेल्या https://crcf.sbi.co.in/ccf/ Under category of Existing Customer (MSME/Agri Loans/Other Grievances ) / under General Banking >> Passbook Related >> Denial/ Difficulties in Passbook updation वर करा.
तसेच बँक म्हणते की, तुम्ही आमच्या ऑनलाईन बँकिंग सेवांचा लाभदेखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही तुमचे व्यवहार तुमच्या घरी पाहू शकाल. ऑनलाईनद्वारे स्टेटमेंट डाऊनलोड करणे आणखी सोपे आहे.
@TheOfficialSBI @narendramodi @PMOIndia @RBI pic.twitter.com/9giOlKYiFh
— Prakash prajapat ca (@ca_prajapat) August 10, 2021
बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही खाते उघडता तेव्हा पहिले पासबुक बँकेकडून दिले जाते, त्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पहिले पासबुक तुम्हाला मोफत दिले जाते. यानंतर जर तुम्ही दुसरे पासबुक बनवले असेल, तर तुम्हाला 100 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. तसेच प्रति पृष्ठ 50 रुपये जीएसटी (40 नोंदी) देखील आकारले जातात. अशा परिस्थितीत आजकाल अधिक पासबुक छापण्यासाठीही शुल्क आकारले जात आहे.
संबंधित बातम्या
पॅन-आधार लिंक करणे आवश्यक, परंतु ‘या’ लोकांना सूट, पाहा संपूर्ण यादी
तुमचे आधार कार्ड बनावट आहे का?, तात्काळ ऑनलाईन चेक करा
Is there a glitch in your passbook print machine at your SBI branch? Then complain like this