तुमचे आधार कार्ड बनावट आहे का?, तात्काळ ऑनलाईन चेक करा
भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (यूआयडीएआय) ने लोकांना याबाबत सतर्क केलेय. यासह आधार कार्ड धारकांना त्यांचे आधार पडताळण्याचे मार्ग देखील सांगितले गेलेत.
1 / 5
संग्रहीत छायाचित्र
2 / 5
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने इशारा दिला आहे की, सर्व 12 अंकी संख्या आधार नाहीत. प्राधिकरणाने यापूर्वी आधार कार्ड फसवणुकीविरोधात इशाराही दिला होता. त्यात आधारधारकाला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी पडताळणी करण्यास सांगितले. तुम्ही दोन टप्प्यांत ऑनलाईन पद्धतीने तुमचे आधार कार्डाची पडताळणी करू शकता.
3 / 5
आधार कार्ड एखाद्याचा ओळख पुरावा म्हणून स्वीकारण्यापूर्वी आपण त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. यूआयडीएआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड नंबरच्या पडताळणीसाठी प्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करावे लागेल.
4 / 5
5 / 5
UIDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आधार कार्डधारक आपले नाव आधार कार्डवर फक्त दोनदा अपडेट करू शकतात. या व्यतिरिक्त जन्मतारीख आणि लिंग आयुष्यात एकदाच अपडेट केले जातात. अॅड्रेस अपडेटबाबत सध्या असा कोणताही नियम नाही.