नवी दिल्ली | 9 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध सुरू झालं आहे. युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्ब वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांचं अतोनात हानी झाली आहे. दोन्ही देशात मोठी जीवितहानी झाली आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याचा फटका दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. या युद्धाचा परिणाम भारतातील कॉमोडिटी मार्केट सोनं आणि चांदीवर झाला आहे. बाजारात वेगाने सोन्याची डिमांड वाढली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीवरील प्रीमियम वेगाने वाढला आहे. शेअर बाजारातही युद्धामुळे मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिओ-पॉलिटकल टेन्शन वाढल्याने सोने-चांदी आणि डॉलरच्या किंमतीत वाढ होऊ शकतं, असं एक्सपर्टचं म्हणणं आहे.
इस्रायल आणि हमासमधील युद्धानंतर सोन्याचे प्रीमियम 700 रुपयांनी वाढून 2000 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे. आधी हा भाव 1300 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. ही वाढ इतक्या मोठ्या प्रमाणात झालीय की काही ठिकाणी सराफा डिलरांनी सोने विकायला मनाई केली आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्ध होतं तेव्हा त्याचा फटका सोनं, चांदी आणि तेलावर होत असतो. यावेळीही इस्रायल आणि हमासच्या युद्धामुळे सोनं आणि चांदी महागणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
दरम्यान, युद्ध आणि जगभरातील आर्थिक संकटामुळे सोन्याची मागणी वाढत असते. युद्ध किंवा आर्थिक संकट आल्यावर गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित ऑप्शन असल्याचं मानलं जातं. जागतिक पातळीवर वेगाने घटना घडत आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओच्या सुरक्षेसाठी सोने हा चांगला पर्याय आहे. सोन्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात घडामोडी घडल्यास डॉलरही मजबूत होत असतो.
भारतात सण उत्सवाचे दिवस अकतानाच इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही देशांच्या युद्धानंतर सोने-चांदीची मागणी वेगाने वाढली आहे. फेस्टिव्ह सीजनमध्ये भारतात सोने आणि चांदीची मागणी वाढू शकते. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती वाढू शकतात. म्हणजेच सण उत्सवाच्या काळात सोने-चांदी खरेदी करणं महागात पडू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नुकतेच सोने हाय लेव्हलच्या सुमारे 5 हजार अंकाने खाली आले आहे. तर चांदी हाय लेव्हलच्या 13000 अंकाने खाली आळे आहे. त्यामुळे दुकानदार आणि गुंतवणूकदारांनी सोने-चांदीवर अधिक फोकस केला आहे. ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या दरम्यान कॉमोडेटी डिमांड पाहता गोल्ड डिलर्स सोनने आणि चांदी विकायला तयार नाहीयेत.
IBJA च्या संकेतस्थळानुसार सराफा बाजारा गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 56,539 रुपये, 22 कॅरेट 51,790 रुपये आणि 18 कॅरेट 42,404 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर चांदीचे रेट 67,095 रुपये किलो आहेत.