प्रत्येक करदात्याच्या पगारातून जर तुम्ही योग्य वेळी कुठे गुंतवणूक केली नसेल तर टॅक्स कापला जातो. त्यामुळे अनेकांना कर वाचवण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी हे देखील माहित नसतं. तुम्हाला पण जर असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही देखील खालील दिलेल्या यादीमध्ये गुंतवणूक करुन कर वाचवू शकतात. आयकर विभाग करदात्यांना कर सवलतीचा लाभ देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कर वाचवण्यासाठी तुमच्याकडे कोणते पर्याय असू शकतात.
एफडी (FD)
5 वर्षांच्या कालावधीसाठी जर तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवले तर तुम्ही आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा कर लाभ घेऊ शकता. एफडीवर ७ ते ८ टक्के व्याज दिले जाते. FD वर मिळणारे व्याज करपात्र आहे. पण तुम्ही त्यावर कर सवलत घेऊ शकता.
PPF
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या गुंतवणूकदारांना देखील करात सूट मिळते. यासाठी लॉक-इन कालावधी 15 वर्षे आहे. पीपीएफमध्ये मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नाही.
इक्विटी लिंक्ड बचत योजना
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) मध्ये, तुम्ही 1 वर्षात 1 लाख रुपयांपर्यंतची करमुक्ती करू शकता. त्यावर कॅपिटल गेन टॅक्स लावला जातो. 10 टक्के कॅपिटल गेन टॅक्स लागू आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) 6.8 टक्के व्याज देते. या योजनेत कोणताही धोका नाही. या योजनेत तुम्ही 1 आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांची कर कपात करू शकता.
जीवन विमा
लाइफ इन्शुरन्स पॉलिसींमध्येही कर सूट उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपात करू शकता.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली
नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही एक स्वयंसेवक योजना आहे. या योजनेत देखील, तुम्हाला प्राप्तिकर कायद्याच्या 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) द्वारे देखील कर वाचवता येतो. यामध्ये तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ घेऊ शकता.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूकदारांना कर सवलतीचा लाभ मिळतो. हा लाभ ६० वर्षांवरील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) देखील तुम्ही पैसे गुंतवू शकतात. ही देखील एक करमुक्त योजना आहे म्हणजेच तिच्या व्याजावर कोणताही कर लागत नाही.