जळगाव, सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या दमदार बॅटिंगमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. शुक्रवारनंतर शनिवारी पण दोन्ही धातूच्या किंमतीत सलग वाढ नोंदविण्यात आली. सोने-चांदीच्या या घौडदौडीमुळे सुवर्णनगरीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मोठा झटका बसला. शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही धातूंनी मोठी भरारी घेतल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली.जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ कायम होती.
असा वधारला भाव
शुक्रवारी चांदीच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी वाढले. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये १६०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात २०० ची दरवाढ झाली. चांदी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने २०० रुपयांनी वधारून ते ७४ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्था अधिकच डळमळत असल्याने बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याच्या शक्यतेने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्यास सुवर्ण व्यवसायिकाचं म्हणणं आहे. या दरवाढीमुळे चांदी पावणे दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे
१४ ते २४ कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७३,०४४, २३ कॅरेट ७२,७५२, २२ कॅरेट सोने ६६,९०८ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५४,७८३ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,७३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८६,१११ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.