Jio Financial Share : सलग तिसऱ्या दिवशी झटका! ‘जिओ’ ला वाचवणार कोण?

| Updated on: Aug 23, 2023 | 2:59 PM

Jio Financial Share : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांना पुन्हा झटका बसला. त्यांच्या जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजचा शेअर सातत्याने तिसऱ्या दिवशी घसरला. गेल्या तीन दिवसांत हा शेअर 15 टक्क्यांनी घसरला. सूचीबद्ध झाल्यानंतर हा शेअर सातत्याने घसरत आहे. आता ही पडझड थांबवणार तरी कोण?

Jio Financial Share : सलग तिसऱ्या दिवशी झटका! जिओ ला वाचवणार कोण?
Follow us on

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या (Jio Financial Services) शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशी या शेअरमध्ये पडझड झाली. गेल्या तीन दिवसांत हा शेअर 15 टक्क्यांनी घसरला. बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी हा शेअर पाच टक्क्यांनी लोअर सर्किटवर उघडला. बीएसईवर या मंगळवारी हा शेअर 224.65 रुपयांवर उघडला. एनएसईवर हा शेअर पाच टक्के घसरणीसह 224.65 रुपयांवर उघडला. रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) त्यांच्या वित्तीय सेवांचा उद्योग विभक्त केला होता. या कंपनीला जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड असे नाव देण्यात आले. रिलायन्स शेअरहोल्डर्सला प्रत्येक शेअरसाठी जिओचा एक शेअर देण्यात आला. हा शेअर गुंतवणूकदारांना लॉटरी लावेल, असे वाटत असताना, या शेअरची पडझड थांबविण्याची वेळ कंपनीवर आली आहे.

कंपनीला मोठा फटका

रिलायन्स शेअरधारकाला एका शेअरच्या बदल्यात जिओचा एक देण्यात आला आहे. जिओच्या शेअरमधील घसरणीचा कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 27,300 कोटी रुपयांनी घसरले आहे. आता या कंपनीचे मार्केट कॅप 1,44,378.38 कोटी रुपये उरले आहे.

हे सुद्धा वाचा

शेअरचे मूल्य असे झाले निश्चित

NSE वर इतके मूल्य

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 261.85 रुपयांवर निश्चित झाला. या कंपनीचा आयपीओ दोन-तीन महिन्यांनी येईल. प्री-ओपन सत्रात एनएसईवर रिलायन्स शेअरची किंमत 2,580 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहचली. यापूर्वी एनएसईवर क्लोजिंग प्राईस 2,841.85 रुपये होती. या दोन किंमती आधारभूत धरत 2,841.85—2,580 : 261.85 रुपये अशी शेअरची किंमत आली.

BSE वर हे मूल्य

बीएसईवर स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये रिलायन्सच्या शेअरची किंमत 2,589 प्रति शेअरवर आली. तर एका दिवसापूर्वी शेअरची क्लोजिंग प्राईस 2,840 रुपये होती. या किंमती आधारभूत धरत बीएसईवर 2,840—2,589 : 251 रुपये अशी शेअरची किंमत निश्चित झाली.

लोअर सर्किटमध्ये फसला शेअर

हा शेअर या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी बाजारात सूचीबद्ध झाला. पण मुहूर्तावरच त्याने माती खाल्ली. हा शेअर तिसऱ्या दिवशी घसरणीवर आहे. त्यामुळे तो लोअर सर्किटमध्ये फसला. बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी हा शेअर निफ्टी आणि सेन्सेक्समधून बाहेर करण्यात येणार होता. आता तो 29 ऑगस्ट रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यानंतर काढण्यात येईल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने घसरणीला ब्रेक लावला. या शेअरमध्ये 0.52 टक्क्यांची तेजी येऊन तो 2532.15 रुपयांवर व्यापार करत आहे. आता रिलायन्ससमोर ही पडझड थांबविण्याचे आव्हान आहे. मुकेश अंबानी यातून मार्ग काढतील अशी आशा गुंतवणूकदारांना आहे.  नाहीतर आयपीओला पण कसा प्रतिसाद मिळेल, याची चिंता आहे.