लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा दृष्टीपथात आहे. देशभरात चौथ्या टप्प्यात मतदान होईल. या दोन वर्षांत अनेक बदल झाले, काही पक्ष सोडले तर काहींनी नवीन पक्ष काढले. राजकारणात अनेक जण नशीब आजमावत आहेत. यात चित्रपट सृष्टीतील चेहरेही तुम्हाला सहज दिसतील. मायानगरीत चार सदनिका असलेल्या या अभिनेत्याने पण राजकारणाची वाट चोखंदळली आहे. भोजपुरी चित्रपट सृष्टीतील स्टार पवन सिंह हा राजकारणात उतरला आहे.
गायनासह अभिनयात पण छाप
भोजपुरी सिनेसृष्टीत पवन सिंह याच्या आवाजाची जादू चालते. तो केवळ 10 वी पास आहे. 2004 मध्ये तो इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. निवडणूक शपथपत्रात त्याने तसा उल्लेख केला आहे. भोजपुरीचा एक मोठा वर्ग आहे. त्यातील अनेक दिग्गज अभिनेते खासदार म्हणून निवडून आले आहेत. तो बिहार राज्यातील काराकाट लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
इतक्या संपत्तीचा मालक
या भोजपुरी स्टारकडे संपत्तीची रास आहे. त्याच्याकडे 5 कोटी 4 लाख 819 रुपयांची जंगम मालमत्ता तर 10 कोटी 31 लाख 38 हजार 840 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. निवडणूक शपथपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्याकडे अवघी 60 हजार रुपयांची रोख आहे. त्याची एकूण संपत्ती 2 कोटी 60 लाख 10 हजार 237 रुपये आहे. त्याच्याकडे 31 लाख 4 हजारांची सोने आणि चांदीचे दागिने आहेत. त्याने 66 लाख 39 हजार 428 हजारांचा विमा आहे. त्याच्यावर एकूण 1 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
कोट्यवधींच्या घराचे मालक
पवन सिंह याच्याकडे कोट्यवधींची घरे आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सुशांत गोल्फ सिटीमध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे. याशिवाय मुंबईत पवन सिंहकडे 4 फ्लॅट आहे. या घरांची एकूण किंमत 6.5 कोटी रुपये आहे.
पवनकडे किती आलिशान कार
भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह आलिशान कारचा शौकीन आहे. त्याच्याकडे लोकप्रिय कंपनीच्या कार आहे. त्याच्याकडे 20 लाखांची एक Toyota Fortuner, जवळपास 25 लाखांची एक Toyota Innova Hycross आणि जवळपास 95 लाखांची एक रेंज रोव्हर कार आहे. याशिवाय त्याच्याकडे 60 हजारांची एक स्कूटी आहे. पवन सिंहकडे एकूण 1 कोटी 39 लाख 75 हजारांची वाहनं आहेत.