नवी दिल्ली : प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. आपले भविष्य सुरक्षीत व्हावे यासाठी व्यक्ती कमावलेल्या पैशांमधून एक विशिष्ट रक्कम बाजूला ठेवत असतो. मात्र हे बचत केलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्यामधून चांगला परतावा मिळवता येतो. अनेकजण आपल्या बचतीचा पैसा हा फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवतात, मात्र त्यातून म्हणावा तसा चांगला परतावा मिळत नाही. आता तर अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात कपात केली आहे. या व्याजदर कपातीचा फटका ग्राहकांना बसत आहे. फिक्स डिपॉझिटशिवाय अन्य अनेक गुंतवणुकीचे मार्ग आहेत, ज्या योजनांमध्ये पैसे गुतंवणूक केल्यास आपल्याला चांगला परताना मिळू शकतो. या योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला तुमच्या बचतीच्या पैशांबाबत कुठलीही जोखमी घ्यायची नसल्यास, तुम्ही पोस्टाच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. या योजनांमधून मिळणारा परतावा निश्चितच फिक्स डिपॉझिटपेक्षा अधिक असतो. सध्या पोस्ट ऑफीसच्या दोन योजना चांगल्या लोकप्रिय होत आहेत. या योजनाला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. यातील पहिली योजना अशी आहे की, ज्यामध्ये तुम्ही पोस्टामध्ये खाते उघडून आपली रक्कम ठेवू शकतात. या रकमेवर तुम्हाला दर महिन्याला व्याज म्हणून विशिष्ट रक्कम देण्यात येते. ही रक्कम फिक्स डिपॉझिटमधून मिळणाऱ्या रकमेपेक्षा अधिक असते. तर दुसऱ्या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला विशिष्ट रक्कम पोस्टमधील तुमच्या खात्यात जमा केल्यास, ठराविक मुदतीनंतर तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळतो.
डेट फंड हा गुंतवणुकीचा असा एक मार्ग आहे, ज्यामध्ये निश्चित परताव्याची खात्री नसते. मात्र या योजनेत अल्पकालावधीसाठी करण्यात येणारी गुंतवणुक फायदेशीर ठरू शकते. ज्या व्यक्तीची पैशांबाबत जोखमी स्वीकारायची तयारी आहे अशा व्यक्तीने या योजनेत पैसा गुंतवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे म्यूचल फंडमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीमधून देखील मोठा नफा तुम्हाला मिळू शकतो. मात्र त्यासाठी गुंतवणुकीपूर्वी मार्केटचा अंदाज घेणे आवश्यक असते.
PHOTO | IFSC: IFSC कोड म्हणजे काय? आर्थिक व्यवहारासाठी का आहे आवश्यक? जाणून घ्या प्रत्येक अंकाचा अर्थhttps://t.co/cVe9FyKZ5x | #IFSC | #business |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या
भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर स्वस्त करण्यासाठी अमेरिकेची मदत; काय आहे नवी रणनिती?
ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयचे मोठे पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय