Online Shopping Rules to Change for E-Commerce Companies नवी दिल्ली : अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ई-कॉमर्स साईट ऑनलाईन शॉपिंग करतात. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी या सर्व साईट्सकडून वेळोवेळी वेगवेगळ्या ऑफरही देण्यात येतात. मात्र, आता सरकारच्या याच ऑनलाईन शॉपिंगबाबतच्या नव्या होऊ घातलेल्या नियमांविषयी समजून घेणं आवश्यक आहे. सरकार ई-कॉमर्स कंपन्यांबाबत काही कठोर निर्णय घेऊन त्याची तितक्याच कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा विचार करत आहे. यानुसार आता या ई कॉमर्स साईट्सला फ्लॅश सेल्स करण्यास बंदी घालण्यात येणार येऊ शकते. इतकंच नाही तर ग्राहक संरक्षण कायद्यातही मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे (Know all about new rules and regulation about online shopping and E Commerce company).
सरकारच्यावतीने निधी खरे म्हणाल्या, “सर्वसाधारण डिस्काउंट सेलवर बंदी नाहीये. केवळ फ्लॅश सेलवर बंदी असेल. फ्लॅश सेल म्हणजे ई कॉमर्स कंपनी केवळ एक-दोन निवडक विक्रेत्यांना उभं करते. ते विक्रेते एक, तर बॅक टू बॅक सेल करतात. त्यामुळे ग्राहकांकडे कमी पर्याय मिळतात. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर परिणाम होतो. या सर्व चुकीच्या पद्धती आहेत. त्यावर नियंत्रण येणं आवश्यक आहे.”