नवी दिल्ली: सरकारी योजनांपाठोपाठ आपल्याकडे जीवन बीमा निगम अर्थात LIC मधील गुंतवणूक हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. देशातील कोट्यवधी लोक खात्रीशीर आणि चांगल्या परताव्यासाठी LICच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी LIC ची जीवन आनंद पॉलिसी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Know everything about LIC jeevan anand policy)
ही एलआयसीची सर्वात लोकप्रिय पॉलिसी आहे. या योजनेत तुम्हाला प्रत्येकवर्षी एक निश्चित रक्कम मिळते आणि पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यावर 5 लाख रुपये मिळतात.
एखाद्या व्यक्तीने 36 व्या वर्षी या पॉलिसीत गुंतवणुकीला सुरुवात केली तर पाच लाख रुपयांच्या विम्यासाठी साधारण 2500 हजार रुपये जमा करावे लागतील. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 22500 रुपयांचा वार्षिक बोनस मिळायला सुरुवात होईल. ही रक्कम 20 वर्षांपर्यंत मिळेल. याशिवाय, तुम्हाला 10 हजारांचा अतिरिक्त बोनसही दिला जातो.
जीवन आनंद पॉलिसीमध्ये कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाच लाख रुपये मिळतात. तुम्ही 2500 हजारांचा मासिक हप्ता भरत असाल तर तुम्हाला 22500 रुपयांचा बोनस मिळतो. याची आकडेमोड करायची झाल्यास संपूर्ण पॉलिसीवर तुम्हाला जवळपास साडेचार लाखांचा बोनस आणि 5 लाखांची मॅच्युरिटीची रक्कम मिळते.
एलआयसीच्या संकेतस्थळावर तुम्हाला या योजनेची माहिती मिळू शकते. यामध्ये तुम्हाला 5 लाखांची मॅच्युरिटीची रक्कम आणि एकूण 4.60 लाखांचा बोनस असा दुहेरी लाभ मिळतो.
इतर बातम्या
LIC च्या या पॉलिसीत पैसे 233 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी मिळवा 17 लाख रुपये
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा 150 रुपये, नोकरी मिळण्यापूर्वी मुलं होतील लक्षाधीश
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर
(Know everything about LIC jeevan anand policy)