मुंबई – महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) कालच्या तुलनेत आज मोठी भाववाढ दिसून आली. राजधानी मुंबईत आज (गुरुवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 670 रुपयांची भाववाढ नोंदविली गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याची भावात पडछड दिसून येत आहे. राजधानी मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49650 व 22 कॅरेट सोन्याला 45500 रुपये भाव मिळाला. कोविड काळात गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेचा सामना करत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव…
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :
• मुंबई- 49650 रुपये (रु.670 वाढ)
• पुणे- 49050 रुपये (रु.70 वाढ)
• नागपूर- 49650 रुपये (रु.670 वाढ)
• नाशिक- 49050 रुपये (रु.150 वाढ)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):
• मुंबई- 45500 रुपये (रु 600 वाढ)
• पुणे- 45050 रुपये(रु. 150 वाढ)
• नागपूर- 45500 रुपये(रु.600 वाढ)
• नाशिक- 45050 रुपये(रु.70 वाढ)
भावात अस्थिरता, गुंतवणुकदार दोलायमान?
सोन्याच्या भावात अस्थिरता दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात पडछड नोंदविल्यानंतर गुंतवणुकदारांनी सोने खरेदीला पुन्हा प्राधान्य दिले होते. सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भाववाढीचा आलेख खालावला होता. मात्र, आज सोन्याचे भाव उंचावले आहेत. त्यामुळे सोने खरेदीचा दर पुन्हा मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे अर्थतज्ज्ञांची सोन्याच्या भावात चढ-उताराची स्थिती राहील असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविलेला आहे.
निर्धास्त राहा, मिस्ड् कॉल करा:
तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.
सोन्याच्या खरेदी करताना सावधान?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).