रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतींवर झाला असून, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आज गुरुवारी कच्च्या तेलाचे दर जवळपास प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. एकीकडे आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. मात्र दुसरीकडे भारतात अद्यापही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधनाचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतात. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास इंधनाच्या दरात वाढ होते. मात्र भारतात गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज देखील त्याच्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109. 98 रुपये तर डिझेल 84. 24 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91.43 रुपये लिटर आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 रुपये एवढे असून, डिझेलसाठी 86.67 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तरी देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ अशीच राहिली तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्याप्रमाणात वाढू शकतात.
देशात गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याने चार नोव्हेंबर 2021 ला पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर गगणाला भिडले आहेत, मात्र भारतात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. मात्र येत्या दहा मार्चला पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहेत, त्यानंतर दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Ukraine Russia war: सोने हजार रुपयांनी महागले, चांदीच्या दरातही वाढ
दिलासादायक! फेब्रुवारीमध्ये निर्यात वाढली, 22 टक्क्यांच्या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर