LIC ला मोठा झटका, 50 दिवसांत 50 हजार कोटींचे नुकसान!

| Updated on: Feb 24, 2023 | 3:44 PM

अदानी यांच्या शेअरमध्ये सुरु असलेल्या घसरणीमुळे LIC ची संपत्ती कमी झाली आहे. केवळ 50 दिवसांत 50 हजार कोटींचा फटका LIC ला बसला आहे.

LIC ला मोठा झटका, 50 दिवसांत 50 हजार कोटींचे नुकसान!
आता घेणार आढावा
Follow us on

नवी दिल्ली : महिन्याभरापुर्वी म्हणजेच 24 जानेवारी रोजी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या आयुष्यात वादळ आले. हे वादळ अजून ही शमले नाही. अदानी समूहातील या वादळचा फटका भारतातील सर्वात मोठा जीवन विमा कंपनी LIC ला बसला आहे. अदानी समूहात गुंतवणूक केल्यामुळे LIC चे चांगलेच आर्थिक नुकसान झाले आहे. अदानी यांच्या शेअरमध्ये सुरु असलेल्या घसरणीमुळे LIC ची संपत्ती कमी झाली आहे. केवळ 50 दिवसांत 50 हजार कोटींचा फटका LIC ला बसला आहे. अमेरिकन संशोधन कंपनी हिंडनबर्गने अदानीबद्दल 106 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर घसरु लागले आहे.

किती होती गुंतवणूक आता किती झाली

हे सुद्धा वाचा


बिजनेस टुडेच्या अहवालानुसार, LIC ने गौतम अदानी यांच्या विविध कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक (LIC Investment In Adani Shares) केली होती. 31 डिसेंबर 2022  रोजी LIC चे गुंतवणूक मुल्य 82 हजार 970 कोटी  रुपये होते. ते 23 फेब्रुवारी 2023 रोजी 33 हजार 242 कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच LIC ला 50 दिवसांत 49 हजार 728 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

LIC शेअरही घसरले


LIC ने अदानी ग्रुपच्या सर्वच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. त्यात Adani Enterprises, Adani Green Energy, Adani Ports, Adani Total Gas, Adani Transmission, Ambuja Cements and ACC यांचा समावेश आहे. बिजनेस टुडेनुसार, एलआयसीतील गुंतवणुकीवर अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलण्यास नकार दिला. परंतु शेअर बाजारात चढ-उतार सुरु असतो, असे ते म्हणाले. LIC चा शेअर शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात 585.70 रुपयांवर आला होता.

12 लाख कोटी रुपयांचे नुकसान

हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालात केवळ एका महिन्यात अदानी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी समूहाच्या शेअर्सचे एकूण मार्केट कॅप एका महिन्यात 62 टक्क्यांनी खाली येऊन 7.32 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

महिन्याभरापुर्वी काय झाले

24 जानेवारी 2023 रोजी, अमेरिकेच्या शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने गौतम अदानीबद्दल 106 पानांचा अहवाल जारी केला. यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत जगाचा दृष्टिकोनच बदलला. समूहाच्या शेअर्समध्येही वादळ आले. या अहवालामुळेच गौतम अदानी यांची वैयक्तिक संपत्तीही बुडाली. महिन्याभरापूर्वी जगातील टॉप 3 श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत असलेले गौतम अदानी आता जगातील टॉप 25 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.