नवी दिल्ली : देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच खास योजना आणत असते. आताही LIC ने ग्राहकांसाठी जीवन अमर प्लॅन (Jeevan Amar Plan) हा एक मुदत विमा (टर्म इंश्योरंस) आणला आहे. या पॉलिसीच्या काळामध्ये विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे कोरोनासारख्या कठीण काळात ही योजना ग्राहकांसाठी अत्यंत उपयोगाची आहे. (lic jeevan amar plan here know its features and eligibility)
जीवन अमर प्लॅनची कमीत-कमी मुदत 10 वर्षांची आणि जास्तीत-जास्त मुदत 40 वर्षांची आहे. 18 वयोगटातील व्यक्तीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे LIC ची ही जीवन अमर योजना फक्त स्वस्तच नाही तर यामध्ये अनेक खास सूविधा देण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसीच्या जीवन अमर योजनेत प्रीमियम पेमेंट पर्यायदेखील उपलब्ध आहे. यामध्ये सिंगल प्रीमियम, रेग्युलर प्रीमियम आणि लिमिटेड प्रीमियम अशा सुविधा आहेत. लिमिटेड प्रीमियम अंतर्गत प्रीमियम पेमेंट टर्म (PPT), पॉलिसीची मुदत 5 वर्षांपेक्षा कमी आणि दुसऱ्या पॉलिसीची मुदत 10 वर्षांपेक्षा कमी असेल. तर प्रीमियम भरण्यासाठी कमाल वय हे 70 वर्षे असेल. नियमित आणि मर्यादित प्रीमियम पर्यायांतर्गत किमान प्रीमियम हप्ता 3000 रुपये असणार आहे. एकाच प्रीमियम पर्यायांतर्गत किमान प्रीमियम हप्ता 30,000 रुपये ठेवण्यात आला आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या नियमांसोबत समाधानी नसेल तर पॉलिसी सुरू केल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत कंपनीला पॉलिसी परत केली जाऊ शकते. पॉलिसी परत मिळाल्यानंतर कंपनीकडून ती रद्द करण्यात येईल आणि जमा प्रीमियमची रक्कम पुन्हा खात्यात जमा केली जाईल.
LIC चा जीवन अमर प्लॅन 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. यासाठी किमान मॅच्योरिटी 80 वर्षांची आहे. जीवन अमर योजनेअंतर्गत कमीत-कमीत टर्म 10 वर्षांची आणि जास्तीत-जास्त टर्म 40 वर्षांची आहे. रेग्युलर प्रीमियम पर्यायांतर्गत कोणतेही सरेंडर मूल्य मिळणार नाही. पण यामध्ये सिंगल प्रीमियम देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर लिमिटेड प्रीमियम पर्यायामध्ये काही नियम व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी प्रीमियमची रक्कम वेगळी असणार आहे.
धूम्रपान न करणाऱ्या ग्राहकांसाठी कमी प्रीमियम
या खास पॉलिसीमध्ये धूम्रपान करणाऱ्या आणि न करणाऱ्या ग्राहकांसाठी वेगळे नियम असणार आहेत. यामध्ये पुरुषांसाठी स्त्रियांपेक्षा जास्त प्रिमियम असणार आहे. इतकंच नाही तर धूम्रपान करणाऱ्यांसाठी जास्त आणि धूम्रपान न करण्याऱ्यांसाठी कमी प्रीमियम असणार आहे. (lic jeevan amar plan here know its features and eligibility)
इतर बातम्या –
New Year ला आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, 1 जानेवारीपासून होणार पगार वाढ
Petrol Diesel Price Today: गाडी चालवताय, मग पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या..
खबरदार! विनापरवानगी LIC चा लोगो वापराल, तर कठोर शिक्षेस तयार राहाhttps://t.co/MfkmXVuNsq#LIC @LICIndiaForever #LICLOGO
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
(lic jeevan amar plan here know its features and eligibility)