मुंबई: सरकारी योजनांपाठोपाठ आपल्याकडे जीवन बीमा निगम अर्थात LIC मधील गुंतवणूक हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. देशातील कोट्यवधी लोक खात्रीशीर आणि चांगल्या परताव्यासाठी LICच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी LIC ची जीवन लाभ पॉलिसी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (LIC jeevan labh scheme get upto 17 lakh on maturity by investing 233 rs on daily basis)
जीवन लाभ पॉलिसी हा एक नॉन-लिंक्ड प्लॅन आहे. जे लोक शेअर बाजारातील अस्थिरतेला घाबरत असतील अशा लोकांसाठी या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. जीवन लाभ पॉलिसीत तुम्ही दररोज फक्त 233 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी 17 लाख रुपये मिळवू शकता.
जीवन लाभ पॉलिसीत बोनससह डेथ आणि मॅच्युरिटी असे दोन्ही लाभ मिळतात. या योजनेच्या कालावधीसाठी 10,15 आणि 16 वर्षे असे तीन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या योजनेत गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा 2 लाख रुपये इतकी आहे.
जीवन लाभ पॉलिसीवर तुम्ही कर्ज घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तीन वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच या योजनेत मॅच्युरिटी बेनिफिट, डेथ बेनिफिट, सिम्पल रिवर्जनरी बोनस आणि फायनल बोनस मिळतो.
तुम्ही जीवन लाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी चांगल्या पैशांची व्यवस्था करु शकता. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरु करा, तितका फायदा तुम्हाला मिळेल. तुम्हाला 17 लाख रुपयांचा परतावा हवा असेल तर 16 वर्षांचा टर्म प्लॅन घ्यावा लागेल. तुम्ही आता 23 वर्षांचे असाल आणि तुम्हाला 16 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 10 लाख इतकी सम अश्योर्ड या पर्यायाची निवड करावी. त्यानुसार तुम्हाला 10 वर्ष दररोज 233 रुपयांच्या हिशोबाने पैसे जमा करावे लागतील. मात्र, या योजनेचा प्रीमियम मासिक किंवा त्रैमासिक स्वरुपात अदा करावा लागतो. अशाप्रकारे 10 वर्षात तुम्ही एकूण 8.55 लाख रुपये गुंतवाल. त्यानंतर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 17.13 लाख रुपये मिळतील.
इतर बातम्या
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा 150 रुपये, नोकरी मिळण्यापूर्वी मुलं होतील लक्षाधीश
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर
(LIC jeevan labh scheme get upto 17 lakh on maturity by investing 233 rs on daily basis)