मुंबई : तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तर एलआयसीची (LIC) ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’ (LIC New Children’s Money Back Plan) पॉलिसी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत लाखोंचा परतावा देण्यात येईल. ज्यामुळे त्याचे शिक्षण किंवा इतर गरजा पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. (LIC New Children’s Money Back Plan will make your child a millionaire, know details)
एलआयसीची न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन पॉलिसी 25 वर्षांची आहे. यात मॅच्योरिटी रक्कम टप्प्या टप्प्यांमध्ये मिळते. या योजनेंतर्गत एलआयसीकडून मुलांचे वय 18 वर्षे, 20 वर्षे आणि 22 वर्षे इतके झाल्यानंतर मूलभूत रकमेपैकी 20-20 टक्के रक्कम दिली जाते. उर्वरित 40 टक्के रक्कम मुलाची 25 वर्ष पूर्ण झाल्यावर दिली जाते. इतकेच नव्हे तर मॅच्युरिटीच्या रकमेसह बोनसदेखील दिला जातो.
पॉलिसी घेण्यासाठी पालकांकडे त्यांचे आणि मुलाचे आधार कार्ड असले पाहिजे. याशिवाय पॅनकार्ड आणि अॅड्रेस प्रूफची फोटोकॉपी जमा करावी लागेल. या पॉलिसीसाठी विमाधारकाची वैद्यकीय कागदपत्रे देखील आवश्यक असतात. अर्जासाठी एलआयसी शाखेकडून योजनेशी संबंधित फॉर्म घ्या आणि कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर सबमिट करा.
संबंधित बातम्या :
तुमच्याकडे दोन रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?
Personal Loan घेताय, मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Investment tips : 5 वर्षात रक्कम डबल, SIP सुरु करण्यासाठी 5 चांगल्या योजना
(LIC New Children’s Money Back Plan will make your child a millionaire, know details)