मुंबई : जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या एलआयसीने जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजमध्ये (JFSL) 6.66 टक्के शेअर घेतले आहेत. एलआयसीने सांगितलं आहे की, शेअर्स डिमर्जर प्रक्रियेद्वारे मिळाले आहेत. कंपनीने रिलायन्स इंडस्टीजपासून वेगळे झालेल्या जिओ फायन्सासशिअल सर्व्हिसेसमध्ये 6.66 टक्के हिस्सेदारी घेतली आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्सची सोमवारी मार्केटमध्ये एंट्री झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजपासून जिओ फायनान्शिअलच्या विलगीकरणाचा फायदा विमा कंपनीला झाला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विलगीकरणापूर्वी एलआयसीला हा स्टॉक 4.68 टक्के खर्चाच्या बरोबरीने मिळाला आहे. 30 जून 2023 पर्यंत एलआयसीची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 6.49 टक्के भागीदारी होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 4.68 टक्के समभागांच्या डिमर्जरच्या बदल्यात मिळालेली रक्कम नॉन-बँकिंग वित्तीय संस्था जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अधिग्रहणासाठी वापरली गेली आहे. 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जिओ फायनान्सशिअल सर्व्हिसेस कंपनीत अंबानी कुटुंबाचा 46 टक्के वाटा आहे आणि एलआयसी कंपनीच्या प्रमुख भागधारकांपैकी एक आहे.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजचा शेअर 21 ऑगस्टला बीएसईवर 265 रुपयांना लिस्ट करण्यात आला होता.जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी लोवर सर्किट लागलं आहे. या कंपनीचा स्टॉक 4.99 टक्के घसरणीसह 239.20 वर ट्रेड करत होता. फायनान्शिअल सर्व्हिसेज कंपनीच्या मार्केट कॅप जवळपास 1.60 लाख कोटी रुपये आहे.
जिओ फायनान्सशिअल सर्व्हिसेस कंपनीकडे इंश्युरन्स आणि म्युचुअल फंडचा परवाना आहे. तसेच 6 कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे. रिलायंस इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स (RIIHL), रिलायंस पेमेंट सॉल्यूशन्स, रिलायन्स रिटेल फायनान्स, जियो पेमेंट्स बँक, जियो इंफॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिस आणि रिलायन्स रिटेल इंश्योरेंस ब्रोकिंग लिमिटेड या कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे.
एलआयसीच्या शेअर्समध्येही आज एक टक्क्यांनी वाढ होऊन ट्रेड करत होता. दुपारी दीडच्या आसपास एलआयसीचा शेअर 11.60 रुपये किंवा 1.78 टक्क्यांच्या तेजीसह 663.75 रुपये प्रति शेअर ट्रेड करत होता.