LIC ची जबरदस्त योजना, एकदाच पैसे भरा आणि 14 लाख मिळवा
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने ही योजना तयार केली आहे. विशेषत: जे एकरकमी गुंतवणूक करतात, त्यांना लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार करण्यात आलीय. ही कमाई गुंतवणुकीच्या मॅच्युरिटीवर निवृत्तीवर गिफ्ट म्हणून असू शकते.
1 / 5
आज आपण एलआयसीच्या अशा योजनेबद्दल जाणून घेऊयात जी एकल प्रीमियम पॉलिसी आहे. ही पॉलिसी 10-25 वर्षांमध्ये मॅच्युरिटी होते, म्हणून तिची मुदत ठेवींशी तुलना करणे आवश्यक आहे. तुलनात्मक आधारावर ती एफडीपेक्षा चांगला परतावा देते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने ही योजना तयार केली आहे. विशेषत: जे एकरकमी गुंतवणूक करतात, त्यांना लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार करण्यात आलीय. ही कमाई गुंतवणुकीच्या मॅच्युरिटीवर निवृत्तीवर गिफ्ट म्हणून असू शकते.
2 / 5
या पॉलिसीचा टेबल नंबर 917 आहे. पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास किमान प्रवेश वय 90 दिवस आणि कमाल प्रवेश वय 65 वर्षे आहे. त्याचे कमाल मॅच्युरिटी वय 75 वर्षे आहे. पॉलिसीची मुदत 10-25 वर्षांची असते. प्रीमियम भरण्याची मुदत सिंगल प्रीमियम आहे. या पॉलिसीसह दोन प्रकारचे रायडर देखील उपलब्ध आहेत. पहिला रायडर म्हणजे अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ रायडर असतो. तर दुसरा रायडर न्यू टर्म इश्युरन्स रायडर आहे. कर लाभांबद्दल बोलायडे झाल्यास प्रीमियम भरल्यावर, तुम्हाला 80C अंतर्गत करकपातीचा लाभ मिळतो. मृत्यू लाभ 10 (10D) अंतर्गत पूर्णपणे करमुक्त आहे, जरी तो मॅच्युरिटीवर करपात्र आहे.
3 / 5
LIC Scheme
4 / 5
या पॉलिसी अंतर्गत मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट हे दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पहिल्या पर्यायाअंतर्गत विमाधारकाला एकाच वेळी मॅच्युरिटीचा पूर्ण लाभ मिळतो. त्याचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला लाभ मिळतो. दुसऱ्या पर्यायाअंतर्गत विमाधारक 5, 10 किंवा 15 वर्षांसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर EMI म्हणून मॅच्युरिटी रक्कम घेऊ शकतो. त्याच्या मृत्यूनंतर हा लाभ नामनिर्देशित व्यक्तीला दिला जाईल. विमाधारकाला काही रक्कम एकरकमी आणि उर्वरित हप्त्यांमध्ये घेण्याचा पर्याय असेल.
5 / 5
जर आपण या पॉलिसीबद्दल बोलायचे झाल्यास रायडर घेतल्यावर नॉमिनीला सामान्य मृत्यू आणि अपघाती मृत्यूवर अतिरिक्त लाभ मिळेल. एका हिशेबानुसार, जर सध्या 2.4 लाख रुपये FD मध्ये जमा केले, तर 25 वर्षांनंतर 6 टक्के दराने, सुमारे 10.20 लाख रुपये आणि 7 टक्के दराने 12.90 लाख रुपये मिळतील. दुसरीकडे या पॉलिसीमध्ये 2.4 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत 25 वर्षांनंतर 13.62 लाख रुपये होतात. जर 24 व्या वर्षी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला परिपक्वता झाल्यावर 12.87 लाख मिळतील. जर तो अपघातात मृत्युमुखी पडला तर नामांकित व्यक्तीला 17.87 लाख रुपये मिळतील.