LIC ची सर्वोत्तम पॉलिसी, सर्वात कमी प्रीमियमवर 50 लाखांचा विमा

| Updated on: Aug 09, 2021 | 8:26 AM

ही पॉलिसी केवळ 80 वर्षांचे होईपर्यंत कार्य करेल, त्यानंतर नाही. ही पॉलिसी किमान 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे घेतली जाऊ शकते. ही पॉलिसी फक्त त्या लोकांना उपलब्ध आहे, ज्यांचे स्वतःचे उत्पन्न आहे.

LIC ची सर्वोत्तम पॉलिसी, सर्वात कमी प्रीमियमवर 50 लाखांचा विमा
LIC best policy
Follow us on

नवी दिल्लीः LIC best policy: एलआयसी टेक टर्म प्लान क्रमांक 854 ही एलआयसीची सर्वोत्तम पॉलिसी मानली जाते. एलआयसीच्या सर्व टर्म पॉलिसींमध्ये ही सर्वात स्वस्त पॉलिसी मानली जाते. 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी खरेदी करू शकतात. या योजनेत तुम्हाला किमान 50 लाख रुपयांची विमा पॉलिसी घ्यावी लागेल. त्यापेक्षा कमी रुपयांची पॉलिसी तुम्ही घेऊ शकत नाही. ही पॉलिसी केवळ 80 वर्षांचे होईपर्यंत कार्य करेल, त्यानंतर नाही. ही पॉलिसी किमान 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे घेतली जाऊ शकते. ही पॉलिसी फक्त त्या लोकांना उपलब्ध आहे, ज्यांचे स्वतःचे उत्पन्न आहे.

या पॉलिसीमध्ये तीन प्रीमियम पेमेंट पर्याय उपलब्ध

या पॉलिसीमध्ये तीन प्रीमियम पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत. यातील पहिला म्हणजे नियमित प्रीमियम म्हणजे पॉलिसी किती वर्षे आहे, त्या वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. मर्यादित प्रीमियम टर्म अंतर्गत, प्रीमियम एकूण पॉलिसी टर्मपेक्षा 5 वर्षे कमी किंवा 10 वर्षे कमी भरता येतो. तिसरा पर्याय सिंगल प्रीमियम आहे, म्हणजेच पॉलिसी घेताना एकूण प्रीमियम एकावेळीच भरावा लागतो.

पॉलिसी किती जुनी?

या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मृत्यू लाभ आहे. यात पैसे मिळवण्याचे तीन मार्ग आहेत. विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळू शकते. दुसरी पद्धत हप्त्यांची आहे, ज्यात नामनिर्देशित व्यक्तीला 5 वर्ष, 10 किंवा 15 वर्षांनंतर एकरकमी पैसे मिळतात. तिसरा पर्याय एकरकमी रक्कम आणि हप्त्यांचा आहे. यामध्ये काही भाग लमसमवर आणि काही भाग 5 वर्षे, 10 वर्षे किंवा 15 वर्षांवर दिला जातो. विमाधारक पॉलिसी घेताना या तीन पैकी कोणताही पर्याय निवडू शकतो. या पॉलिसीमध्ये धूम्रपान न करणाऱ्यांना कमी प्रीमियम भरण्याची सुविधा मिळते. जर एखाद्या महिलेने ही पॉलिसी घेतली तर तिला प्रीमियमवर सूट देखील मिळेल.

किती प्रीमियम भरावा लागेल?

या पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळे प्रीमियम निश्चित केले जातात. जर 21 वर्षांच्या व्यक्तीने 20 वर्षांची पॉलिसी घेतली तर त्याला दरवर्षी 6,438 रुपये जमा करावे लागतील. 40 वर्षांच्या पॉलिसीसाठी 8,826 द्यावे लागतील. त्याचप्रमाणे जर 40 वर्षांच्या व्यक्तीने LIC टेक टर्म प्लान 20 वर्षांसाठी घेतला, तर त्याला 16,249 रुपये प्रीमियम भरावा लागेल. 40 वर्षांसाठी हा प्रीमियम 28,886 रुपये असेल.
ही एक ऑनलाईन पॉलिसी आहे, जी केवळ ऑनलाईन घेतली जाऊ शकते. तुम्ही LIC च्या वेबसाईटला भेट देऊन ही पॉलिसी खरेदी करू शकता. ही पॉलिसी एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे, ज्या अंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याला विम्याची रक्कम मिळते. यामध्ये इतर पॉलिसींप्रमाणे मॅच्युरिटी मनी नाही. विमाधारक पॉलिसीच्या मुदतीपर्यंत जिवंत राहिल्यास त्यांना पैसे मिळणार नाहीत.

मृत्यू लाभ सुविधा

>>जर विमाधारक पॉलिसीदरम्यान व्यक्ती मृत्युमुखी पडला तर त्याच्या नॉमिनीला अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. मर्यादित प्रीमियम आणि नियमित प्रीमियम योजनांमध्ये समान सुविधा आहेत, तर सिंगल प्रीमियममध्ये काही फरक आहे.
>>जर विमाधारकाचा मृत्यू झाला, तर नामनिर्देशित व्यक्तीला त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 7 पट पैसे मिळतील
>>विमाधारकाचा मृत्यू झाल्याच्या तारखेपर्यंत नॉमिनीला एकूण प्रीमियमच्या 105% मिळतील
>>विमा रकमेची संपूर्ण रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते

एकच प्रीमियम नियम

>>विमाधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला सिंगल प्रीमियमच्या 125 टक्के रक्कम मिळते.
>>मृत्यू झाल्यावर संपूर्ण विमा रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते
>>ही पॉलिसी एक टर्म प्लॅन आहे, त्यामुळे विमाधारकाला कोणतीही मॅच्युरिटी रक्कम मिळत नाही

संबंधित बातम्या

तुम्ही पीएफमधून पैसे काढताय; मग लवकर करा हे काम अन्यथा पैसे अडकणार

Paytm वरून गॅस सिलिंडर करा बुक आणि 2700 रुपये कॅशबॅक मिळवा, ऑफर किती दिवस?

LIC’s best policy, insurance of Rs 50 lakh at lowest premium