IRCTC खात्याशी आधार कार्ड लिंक करा, तुम्ही महिन्यातून 6 नव्हे तर रेल्वेची 12 तिकिटे बुक करू शकता, कसे ते जाणून घ्या

| Updated on: Feb 23, 2022 | 8:45 AM

जर तुम्ही ट्रेनने (Train) प्रवास करत असाल तर IRCTC च्या मोबाईल अॅप आणि त्याच्या वेबसाइटवरून तिकीट बुकिंग करू (Train ticket booking)  शकता. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून आपण कुठूनही तिकीट बुकिंग करू शकतो. जर तुमचे IRCTC खाते आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्ही एका महिन्यात फक्त सहा तिकिटे बुक करू शकता.

IRCTC खात्याशी आधार कार्ड लिंक करा, तुम्ही महिन्यातून 6 नव्हे तर रेल्वेची 12 तिकिटे बुक करू शकता, कसे ते जाणून घ्या
रेल्वे टिकिट बुकिंग
Follow us on

मुंबई : जर तुम्ही ट्रेनने (Train) प्रवास करत असाल तर IRCTC च्या मोबाईल अॅप आणि त्याच्या वेबसाइटवरून तिकीट बुकिंग करू (Train ticket booking)  शकता. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून आपण कुठूनही तिकीट बुकिंग करू शकतो. जर तुमचे IRCTC खाते आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्ही एका महिन्यात फक्त सहा तिकिटे बुक करू शकता. तेच जर आधार कार्ड लिंक असल्यास एका महिन्यात जास्तीत जास्त 12 तिकिटे बुक करता येतील. IRCTC खाते आधारशी कसे लिंक करायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

IRCTC खाते लॉगिन करा आणि फायदा मिळवा

यासाठी तुमचे IRCTC खाते लॉगिन करा, यासाठी www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा. युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने खात्यात लॉग इन करा. त्यानंतर My Profile या पर्यायावर जा आणि Aadhaar KYC वर क्लिक करा. इथे क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. ओटीपी पडताळणीनंतर, आधार पडताळणी पूर्ण होते.

KYC तपशीलांची संपूर्ण माहिती खालील भरा. सर्वप्रथम सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि नंतर सबमिट करा. पॅसेंजर आधार पडताळणीबद्दल बोलताना, माय प्रोफाइलवर जा आणि मास्टर लिस्टवर क्लिक करा. येथे प्रवाशाचे संपूर्ण तपशील भरा आणि पुढे जा. आधार पडताळणीनंतर त्या प्रवाशाचे नाव मास्टर लिस्टमध्ये जोडले जाईल. एसी कोचसाठी रेल्वेच्या तत्काळ तिकिटांचे बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. तसेच स्लीपर कोचचे बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. तत्काळ तिकीट सेवा प्रवासाच्या एक दिवस आधी सुरू होते.

एका महिन्यात 12 तिकिट बुक करू शकता! 

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वेळ वाचवण्यासाठी आधी प्रवाशांची यादी तयार करावी. मास्टरलिस्टच्या मदतीने तुम्ही त्या सर्व प्रवाशांचे तपशील अगोदर सेव्ह करू शकता. ही सुविधा IRCTC वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. ही सुविधा IRCTC खात्याच्या माय प्रोफाइल विभागात उपलब्ध आहे. असे केल्याने तुमचा तिकीट बुक करतानाचा वेळ वाचेल आणि तुम्हाला एका क्लिकवर प्रवाशांची माहिती मिळेल.

संबंधित बातम्या : 

पॉलिसी मॅच्युरिटीनंतर किती कर द्यावा लागतो? आयुर्विम्याबाबत जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी

कच्च्या तेलाचा भडका, भाव 100 डॉलरच्या उंबरठ्यावर, पेट्रोल सव्वाशेपार?