नवी दिल्लीः LPG cylinder price: सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 859.5 रुपये झालाय. तर तो पूर्वी 834.50 रुपये मिळत होता. यापूर्वी 1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला IOC ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 73.5 रुपये प्रति सिलिंडर वाढवली होती. या काळात कंपनीने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत.
दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 834.50 रुपयांवरून 859.50 रुपये झालीय. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत आता 886 रुपये आहे. मुंबईतील सिलिंडरसाठी 834.5 ऐवजी 859.5 रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये सिलिंडरसाठी ग्राहकांना 850.50 ऐवजी 875.5 रुपये द्यावे लागतील.
दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1623 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1629 रुपये, मुंबईत 1579.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1761 रुपये प्रति सिलिंडर आहे. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात. वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून 719 रुपये प्रति सिलिंडर करण्यात आली.
15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली. यानंतर 25 फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलिंडरची किंमत 794 रुपये करण्यात आली. मार्च महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 819 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. एप्रिलच्या सुरुवातीला 10 रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीतील घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 819 रुपये प्रति सिलिंडरवरून 809 रुपये करण्यात आला. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत एका वर्षात 165.50 रुपयांची वाढ झाली.
एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.
संबंधित बातम्या
स्वस्त गृहकर्जापासून ते विशेष ठेव योजनांपर्यंत, SBI कडून जबरदस्त ऑफर!
LPG cylinder price: Your pocket will be further emptied, LPG cylinder became more expensive