नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा तर मार्चच्या पहिल्या दिवशी किंमतीत वाढ झाली. फेब्रुवारीत चार टप्प्यात गॅसची किंमत तब्बल 125 रुपयांनी वाढली. या महागाईच्या काळात इंडियन ऑईलने आपल्या ग्राहकांना स्वस्त सिलिंडर घेण्याची संधी दिली आहे. कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून ही खुशखबर दिली आहे. यात म्हटले आहे की, जर तुम्ही अमेझॉन अपच्या मदतीने बुकिंग आणि पेमेंट केले तर 50 रुपये वाचू शकतील. ग्राहकांना 50 रुपये कॅशबॅक मिळतील. सध्या 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅसची किंमत दिल्लीमध्ये 819 रुपये, कोलकातामध्ये 845.50 रुपये, मुंबईमध्ये 819 रुपये आणि चेन्नईमध्ये 835 रुपये आहे. (LPG price hike will bring relief, save Rs 50)
1 मार्चला एलपीजी गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ झाली. त्या आधी 25 फेब्रुवारीला 25 रुपये, 15 फरवरीला 50 रुपये आणि 4 फेब्रुवारीला किंमतीत 25 रुपये दरवाढ झाली. जानेवारीत कोणतीही वाढ झाली नव्हती. डिसेंबर महिन्यात 1 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला 50-50 रुपयांची वाढ झाली होती.
मार्चच्या पहिल्या दिवशी 19 किलोग्रामच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 95 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतीत 1614 रुपये, कोलकातामध्ये 1681.50 रुपये, मुंबईत 1563.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1730.50 रुपये आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाईटवर कंपन्यांनी प्रत्येक महिन्याचे नवीन दर जारी केले आहेत. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर जाणून घेऊ शकता.
पूर्वी इंडियन ऑईलमध्ये एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या मंडळांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर असायचे. आता हे संपूर्ण देशासाठी समान केले गेले आहे. म्हणजेच, जरी आपण कोणत्याही वर्तुळात राहत असलात तरीही आपल्याला फक्त एका क्रमांकासह गॅस सिलिंडर बुक करण्याची सुविधा मिळेल. ग्राहक 7718955555 या नंबरवर कॉल करून किंवा संदेश पाठवून गॅस सिलिंडर बुक करु शकतात. (LPG price hike will bring relief, save Rs 50)
Photo : ‘ये चाँदसा रोषन चेहरा’, पूजा सावंतचं ग्लॅमरस रुपhttps://t.co/2okDt6Lh2e #poojasawant | #PHOTOS |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 6, 2021
इतर बातम्या