मुंबई : महागाईनं सगळ्यांचं जगणं मुश्किल केलंय. पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rate) दर गेल्या महिन्याभरापासून स्थिर असले, तरी वाढलेली महागाईही स्थिरच आहेत. इतर वस्तूंच्या दरांमध्ये कोणतीही घट झाल्याची नोंद नाही. अशातच महागाईचा (Inflation) राक्षस गेल्या दहा वर्षात कमालीचा क्रूर झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. दहा वर्षात घरातील जेवणं दुप्पट मगादलंय. समोर आलेल्या सरकारी आकडेवारीसून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महागाईनं गेल्या आठ वर्षातला विक्रम मोडल्याचं नुकतंच समोर आललं. महागाई 7.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. महागाईनं आरबीआयच्या (RBI) मर्यादा मोडल्यानं सगळ्यांचंच बजेट कोलमडलंय. 2012 ते 2022 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये घरातील किराणा सामानापासून अनेक वस्तूंचे दर हे सध्याच्या घडीला दुप्पट आहेत. घरातील सिलिंडर गॅसपासून स्वयंपाकाच्या वस्तूंचा किराणाही महागलेलाय.
2021च्या तुलनेमध्ये 2022 मध्ये अन्नधान्य 7.68 टक्क्यांनी महागलं आहे. नोव्हेंबर 2020 नंतर नोंदवण्यात आलेली ही सर्वाधिक वाढ आहे. तर 2014 ते 2022 दरम्यान, मध्यमवर्गीयांच्या महिन्याच्या बजेटमध्ये 4.47 टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. याचा अर्ध 2014 मध्ये 100 रुपयांना असलेली वस्तू आता 170 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
WPIच्या म्हणण्यानुसार गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये किराणा सामानाची किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 68 टक्क्यांनी वाढली आहे. 2012च्या तुलनेत 2022 मध्ये किराणा मालाचं बिल दुप्पट धालंय.. घरगुती सामान 843 रुपयांत सरासरी येत होतं. आता मात्र याच सामानासाठी 1654 रुपये इतकी रक्कम सामान्यांना मोजावी लागते आहे.