नवी दिल्ली : पन्नास हजाराहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅनकार्डची आवश्यकता असणारी बरीच आर्थिक कामे आहेत. बर्याच वेळा लोक पॅन कार्ड बनवण्यासाठी कंटाळा करतात आणि अचानक पॅनकार्डची गरज भासते तेव्हा ते अस्वस्थ होतात. आपण आपले ई-पॅन कार्ड काही मिनिटांत ऑनलाईन मिळवू शकता. आपले पॅन कार्ड फक्त आधार क्रमांकाद्वारे मिळू शकते. ऑनलाईन इन्स्टंट पॅन कार्ड बनवण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य आहे. पॅनकार्डसाठी तुम्हाला इनकम टॅक्सच्या वेबसाईटवरून अर्ज करावा लागेल. ई-पॅनसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला केवळ 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. (Make PAN card in a few minutes through Aadhar card, know all the procedures)
स्टेप 1 : प्राप्तिकर विभागाची ई-फाईलिंग वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in. वर जा
स्टेप 2 : आता मुख्यपृष्ठावरील ‘Quick Links’ विभागात जा आणि ‘Instant PAN through Aadhaar’ वर क्लिक करा.
स्टेप 3 : नंतर ‘Get New PAN’ या लिंकवर क्लिक करा. हे आपल्याला इन्स्टंट पॅन विनंती वेबपृष्ठावर घेऊन जाईल.
स्टेप 4 : आता आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करुन पुष्टी करा.
स्टेप 5 : आता ‘Generate Aadhar OTP’ वर क्लिक करा. आपल्याला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.
स्टेप 6 : मजकूर बॉक्समध्ये ओटीपी प्रविष्ट करा आणि ‘Validate Aadhaar OTP’वर क्लिक करा. यानंतर ‘Continue’ बटणावर क्लिक करा.
स्टेप 7 : आता आपल्याला पॅन रिक्वेस्ट सबमिशन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल, येथे आपल्याला आपल्या आधार तपशिलाची पुष्टी करावी लागेल आणि अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील.
स्टेप 8 : यानंतर ‘Submit PAN Request’ वर क्लिक करा.
स्टेप 9 : आता यानंतर एक नोंदणी क्रमांक तयार केला जाईल. आपण या नोंदणी क्रमांकाची नोंद करुन ठेवा.
आपल्याला पुन्हा आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावरील ‘Quick Links’ विभागात जा आणि ‘Instant PAN through Aadhaar’ वर क्लिक करा. यानंतर आपण ‘चेक स्टेटस / डाऊनलोड पॅन’ या बटणावर क्लिक करा. येथे आपण आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करुन आपल्या पॅन कार्डची स्थिती तपासू शकता. तसेच आपण येथून आपले पॅन कार्ड डाउनलोड करण्यास सक्षम असाल. (Make PAN card in a few minutes through Aadhar card, know all the procedures)
टरबूज, खरबुजाची शेती, 70 दिवसात 8 लाख कमवले; वाचा जिगरबाज शेतकरी दाम्पत्याची कहाणीhttps://t.co/ybTAKo35l1#farmer |#Watermelon | #melon | #farming
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2021
इतर बातम्या
कामगारांची जबाबदारी घ्या, सरकार तुमच्यासोबत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उद्योजकांना आवाहन