आनंद महिंद्रांचे भडकलेल्या ग्राहकाला उत्तर, 1991 पासून सांगितली स्टोरी, वाचा

| Updated on: Jan 02, 2025 | 4:32 PM

Anand Mahindra: महिंद्रा कारचे सर्व्हिस सेंटर, स्पेअर पार्ट्सच्या समस्या आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन, यावर चिडलेल्या एका ग्राहकाने ‘एक्स’ पोस्ट करत टीका केली. यावर कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले आहे. नेमकं आनंद महिंद्रा काय म्हणालेत? वाचा.

आनंद महिंद्रांचे भडकलेल्या ग्राहकाला उत्तर, 1991 पासून सांगितली स्टोरी, वाचा
Follow us on

Anand Mahindra : सुशांत मेहता नावाच्या व्यक्तीने महिंद्रा कारवर आणि कंपनीच्या सेवेवर संतापून ‘एक्स’वर एक पोस्ट पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘आपण आपल्या कार, सर्व्हिस सेंटर, स्पेअर पार्ट्सच्या समस्या आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन दुरुस्त केले तर बरे होईल.’ यावर कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले आहे.

एखाद्या कारचं डिझाईन किंवा त्या कंपनीची सर्व्हिस न आवडणं आणि यावरुन ग्राहकांच्या तक्रारी येणं, ही गोष्ट खूप सामान्य आहे. अशा वेळी लोकांचा भडका उडणेही अगदी स्वाभाविक आहे. नुकतेच एका व्यक्तीने कंपनीच्या कारडिझाइन, सर्व्हिस, क्वालिटी आणि विश्वासार्हतेवर निशाणा साधत टीकात्मक ट्विट केले तेव्हा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक वाहन रेंज BE6e आणि XEV 9e लॉन्च केल्यानंतर हे ट्विट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

काय होती तक्रार?

सुशांत मेहता नावाच्या व्यक्तीने महिंद्रा कंपनीच्या सेवेबद्दल आणि कारबद्दल एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये मेहता यांनी लिहिले होते की, आपण आपल्या कार, सर्व्हिस सेंटर, स्पेअर पार्ट्सच्या समस्या आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारले तर बरे होईल. आपले प्रत्येक उत्पादन त्यांच्यासाठी आहे जे संशोधन करत नाहीत. प्रसारमाध्यमे तक्रारींनी भरलेली आहेत. मी गाड्यांच्या लूकबद्दल बोलणार नाही.

मेहता पुढे लिहितात, ‘सौंदर्यशास्त्राचा विचार केला तर तुमच्या गाड्या ह्युंदाईसमोर उभ्या राहत नाहीत. आपण एकतर आपल्या गरजेपेक्षा जास्त करत आहात किंवा आपण खूप काही करून शेणासारखे डिझाईन तयार करता.

आनंद महिंद्रा यांनी काय उत्तर दिलं?

आनंद महिंद्रा यांनी सुशांत मेहता यांच्या एक्स पोस्टला उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण आपण किती पुढे आलो आहोत याचा विचार करा. 1991 मध्ये मी कंपनीत रुजू झालो तेव्हा अर्थव्यवस्था नुकतीच खुली झाली होती. एका जागतिक सल्लागार कंपनीने आम्हाला कार व्यवसायातून बाहेर पडण्याचा जोरदार सल्ला दिला कारण त्यांच्या मते आम्हाला त्यात प्रवेश करणाऱ्या परदेशी ब्रँड्सशी स्पर्धा करण्याची कोणतीही संधी नव्हती. तीन दशकांनंतरही आम्ही तिथेच आहोत आणि जोरदार स्पर्धा करत आहोत.’ ‘आपल्या पोस्टप्रमाणे यशस्वी होण्याची भूक भागवण्यासाठी आम्ही सर्व संशय आणि अगदी उद्धटपणाचा वापर केला आहे. होय, आपल्याला मैलांचा पल्ला गाठायचा आहे. सातत्यपूर्ण सुधारणा हाच आमचा मंत्र राहील.’