नवी दिल्लीः जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये सरकार पुन्हा एकदा दिलासा देऊ शकते. सरकार हॉलमार्किंग अनिवार्यची मुदत 3 महिन्यांनी वाढवू शकते. जर हा दिलासा मिळाला तर दागिन्यांना हॉलमार्किंगसाठी नोव्हेंबरपर्यंत वेळ मिळू शकतो. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ज्वेलर्ससोबत बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, हॉलमार्किंग केंद्रे आता दागिने हॉलमार्क करतील. यासह HUID संदर्भात एक कायदेशीर समिती देखील स्थापन केली जाणार आहे. ही समिती ज्वेलर्सच्या सर्व समस्या सोडवेल. हॉलमार्किंग केंद्रे उघडण्यासाठी स्थानिक संघटनांना मान्यताही दिली जाऊ शकते. या केंद्रांसाठी सरकार अनुदानही देऊ शकते.
यापूर्वी गव्हर्नमेंट ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने 16 जून ते 31 ऑगस्टदरम्यान जुन्या स्टॉकला हॉलमार्क करण्याची परवानगी दिली होती. ज्वेलर्स गेल्या काही काळापासून विरोध करत आहेत. आता सरकारच्या या डेडलाईनला फक्त दोन दिवस शिल्लक आहेत, अशा परिस्थितीत सरकार ही डेडलाईन वाढवणार असल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारच्या नवीन सुवर्ण हॉलमार्किंग नियमांच्या निषेधार्थ देशभरात सुमारे 350 ज्वेलर्स संघटना संपावर गेल्यात. सुमारे 350 ज्वेलरी बॉडी सरकारच्या हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) सिस्टीमच्या विरोधात आहेत. ज्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा सोन्याच्या शुद्धतेशी काहीही संबंध नाही, पण फक्त एक बिझनेस ट्रॅकर आहे. हॉलमार्किंगच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी ‘नॅशनल टास्क फोर्स’ स्थापन करणाऱ्या या ज्वेलर्सनी शेअरहोल्डर्सच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारला ‘न्यूट्रल कमिटी’ स्थापन करण्याची विनंती केली होती.
सरकार सोन्याच्या हॉलमार्किंगचा दावा ग्राहक आणि व्यवसाय या दोघांच्या हितासाठी करत आहे. सोन्याचे हॉलमार्किंग 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आलेय. त्यात म्हटले आहे की, “दशके जुने अपारदर्शक आणि शक्यतो संपुष्टात येणाऱ्या व्यवसाय पद्धतींना घाबरणाऱ्या निष्ठावंत लोकांनी खुल्या मनाने पुढे यावे आणि इतरांप्रमाणे बदल स्वीकारावा.”
संबंधित बातम्या
Bank Holdiays: आज ‘या’ 15 शहरांमध्ये बँका बंद राहणार, घरातून बाहेर पडण्यापूर्वी यादी तपासा
Gold Price Today: जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घट, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव