आता आणखी एक भारतीय स्टार्टअप कंपनी आयपीओ आणणार; 2023 च्या सुरुवातीला ‘मीशोचा’ आयपीओ मार्केटमध्ये!

| Updated on: Mar 05, 2022 | 1:09 PM

आता आणखी एक भारतीय स्टार्टअप कंपनी (Indian startup company) आपला आयपीओ (IPO) अर्थात प्रारंभिक सार्वजनिक ऑफर आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी मीशो (Meesho) लवकरच मार्केटमध्ये आपला आयपीओ आणणार आहे.

आता आणखी एक भारतीय स्टार्टअप कंपनी आयपीओ आणणार; 2023 च्या सुरुवातीला मीशोचा आयपीओ मार्केटमध्ये!
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: file
Follow us on

मुंबई : आता आणखी एक भारतीय स्टार्टअप कंपनी (Indian startup company)आपला आयपीओ (IPO) अर्थात प्रारंभिक सार्वजनिक ऑफर आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी मीशो (Meesho) लवकरच मार्केटमध्ये आपला आयपीओ आणणार आहे. याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात आली आहे. मीशो आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. मेशोमध्ये फेसबुकची मूळ कंपनी Meta Platforms ची गुंतवणूक आहे. मिडीया रिपोर्टनुसार मीशो 2023 च्या सुरुवातीला आयपीओ आणू शकते. आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार बंगळूरू स्थित ही कंपनी 2022 च्या शेवटी किंवा 2023 च्या सुरुवातीला लिस्टिंगची तयारी पूर्ण करू शकते. याच पार्श्वभूमीवर सध्या कंपनीकडून भारतीय आणि अमेरिकी एक्सचेंजचं मूल्यांकन सुरू आहे.

57 कोटी रुपयांच्या फंडाची उभारणी

गेल्या सप्टेंबर महिन्यात स्टार्टअप कंपनी मीशोने फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनी आणि बी कॅपिटल ग्रुप यांच्या नेतृत्वाखालील सीरिज एफ फंडिंग फेरीत तब्बल 57 कोटी रुपयांचा फंड उभारला होता. सध्या मीशो आपल्या व्यवसाय विस्तारत असून, छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील कंपनीचा विस्तार झाला आहे. अशातच आता कंपनी 2023 च्या सुरुवातीला आपला आयपीओ आणण्याचा तयारीत आहे. आयपीओच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात निधी उभारण्याचे लक्ष कंपनीचे असणार आहे.

छोट्या शहरांमध्येही मिशोचे ग्राहक

मीशोची स्थापना आयआयटीयन असलेल्या विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल या दोघांनी मिळून 2015 सली केली. मीशोने आपल्या ग्राहकांना एक ऑनलाईन खरेदीचे मोठे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. ज्याचा उपयोग करून ग्राहक ऑनलाई खरेदी करू शकता. मीशोवरून तुम्ही कपड्यांपासून स्कोस्मेटिकपर्यंतच्या वस्तू खरेदी करू शकता. गेल्या काही दिवसांमध्ये मीशोने आपला विस्तार वाढवला असून, छोट्या-छोट्या शहरांमध्ये देखील मीशोचा ग्राहक वर्ग निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

सावधान! एक एसएमएस करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे; तुम्हीही होऊ शकता फिशिंगचे शिकार

पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय हवा आहे? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, सुरक्षेसह मिळवा अधिक परतावा

Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या दरात रेकॉर्ड ब्रेक तेजी, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव