नवी दिल्लीः कोरोनामुळे अर्थव्यवस्था आणि जनता दोघेही उद्ध्वस्त झालेत. संकटाच्या या काळात बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचार्यांच्या बचावासाठी पुढे आल्यात. कर्मचार्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्यात, जेणेकरून त्यांना मदत करता यावी. यासंदर्भात ग्लोबल टेक दिग्गज मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्यांना मोठा बोनस जाहीर केलाय. द वर्जच्या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्यांना 1500-1500 डॉलर म्हणजेच एक लाखाहून अधिक रुपयांचा स्वतंत्र बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. मायक्रोसॉफ्टच्या मुख्य पीपल्स ऑफिसरने (CPO) 8 जुलै रोजी हा बोनस जाहीर केला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बोनस दिला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या जगातील प्रत्येक कर्मचाऱ्याला याचा फायदा होईल. (Microsoft Employees Will Get 1500 Dollar Bonus Amid Corona Crisis)
बोनस म्हणून मायक्रोसॉफ्टला वेगळे 200 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1500 कोटी रुपये द्यावे लागतील. याचा फायदा कंपनीच्या प्रतिमेलाही मोठ्या प्रमाणात होईल. कंपनीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करणारे कर्मचारी आणि मायक्रोसॉफ्टच्या गिटहब, लिंक्डइन आणि झेनिमॅक्स यांसारख्या सहाय्यक कंपन्यांच्या कर्मचार्यांना या बोनसचा लाभ मिळणार नाही. सीएनबीसीच्या अहवालानुसार मायक्रोसॉफ्टकडे रोख राखीव, इक्विटी आणि 125 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये जागतिक स्तरावर 1 लाख 75 हजार 508 कामगार काम करतात. उपाध्यक्षपदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात एक अट देखील आहे. लाभार्थी कर्मचार्यात सामील होणे 31 मार्च 2021 पूर्वीचे असावे.
Microsoft is giving employees a $1,500 pandemic bonus https://t.co/dAwWLGGTpc pic.twitter.com/ocIE3MOnaz
— The Verge (@verge) July 8, 2021
तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या गरजा भागवण्यासाठी एलआयसीची जीवनशांती ही एक लाभदायक योजना आहे. यात दोन पेन्शन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पहिली त्वरित एन्युइटी आणि दुसरी डिफर्ड एन्युइटी आहे. या योजनेत भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि सेवानिवृत्तीनंतर पैशांची कमतरता भागविण्यासाठी दरमहा एक निश्चित रक्कम दिली जाते. एलआयसीची जीवनशांती योजना ही एक नॉन-लिंक्ड योजना आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्यात एकमुखी रक्कम म्हणजेच एकदाच गुंतवणूक करून पेन्शन मिळवू शकता. आपण योजनेंतर्गत त्वरित किंवा नंतर पेन्शन सुविधा घेऊ शकता. ज्यांना नंतर पेन्शन घ्यायची आहे, त्यांनाही 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनंतर हा पर्याय मिळेल.
संबंधित बातम्या
PNB ची धमाकेदार ऑफर; आपल्या इच्छेनुसार डेबिट कार्ड खर्च मर्यादा सेट करा, अशी होणार बचत
Gold Silver Price Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीत मोठी घसरण, पटापट तपासा
Microsoft Employees Will Get 1500 Dollar Bonus Amid Corona Crisis