भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी खुशखबर; ‘मूडीज’कडून चांगल्या परिस्थितीचे संकेत

| Updated on: Oct 19, 2021 | 2:47 PM

आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा झाल्यास बँकिंग क्षेत्रासाठी पत सुधारेल. बँकिंग पत वाढीचा दर वार्षिक 10-13 टक्के असेल असा अंदाज आहे. कमकुवत कॉर्पोरेट वित्त आणि वित्तीय कंपन्यांकडून निधीची कमतरता यामुळे या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मात्र, आता परिस्थिती सुधारली आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी खुशखबर; मूडीजकडून चांगल्या परिस्थितीचे संकेत
मूडीज
Follow us on

नवी दिल्ली: मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने आपल्या अलीकडील अहवालात भारतीय बँकिंग क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारला आहे. यापूर्वी मूडीजकडून भारतीय बँकिंग क्षेत्राला नेगेटिव्ह ग्रोथचे मानांकन देण्यात आले होते. मात्र, आता त्यामध्ये बदल करुन बँकिंग क्षेत्राला स्टेबल मानांकन देण्यात आले आहे. पुढील 12-18 महिने भारताची अर्थव्यवस्था सुधारत राहील असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22), विकास दर 9.3 टक्के असल्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी विकास दर 7.9 टक्के असल्याचा अंदाज आहे.

मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा झाल्यास बँकिंग क्षेत्रासाठी पत सुधारेल. बँकिंग पत वाढीचा दर वार्षिक 10-13 टक्के असेल असा अंदाज आहे. कमकुवत कॉर्पोरेट वित्त आणि वित्तीय कंपन्यांकडून निधीची कमतरता यामुळे या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मात्र, आता परिस्थिती सुधारली आहे.

बँकांनीही निर्णायक पावले उचलली

कॉर्पोरेट कर्जाची गुणवत्ता सुधारली असल्याचे अहवालात म्हटले आहे. हे दर्शवते की बँकिंग क्षेत्राद्वारे कठोर पावले उचलली गेली आहेत. बुडीत कर्ज तसे पुढे नेण्याऐवजी त्यासाठी तरतूद करण्यावर भर देण्यात आला आहे. तथापि, किरकोळ कर्जाची गुणवत्ता घसरली आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्याचे योगदान कमी आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत अहवालात असे म्हटले आहे की, त्यांची बाजारातून पैसे गोळा करण्याची क्षमता सुधारली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बँकांनी सरकारवरील अवलंबित्व कमी केले आहे. आगामी काळात बँकांचा नफा स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

व्याजदर वाढल्यास काय होईल?

व्याजदर वाढल्यास निव्वळ व्याज मार्जिन देखील वाढेल. बँकांकडे सरकारी रोखे मोठ्या प्रमाणात आहेत. अशा स्थितीत जेव्हा व्याज वाढते तेव्हा ओझे वाढते. सलग आठव्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल केलेला नाही. सध्या तरी तशी शक्यता नाही. मात्र, वाढत्या महागाई दरामुळे रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढत आहे.

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट स्थिर

काही दिवसांपूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नवे पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी रेपो रेटमध्यो कोणताही बदल करण्यात आला नव्हता. सलग आठव्यांदा रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के इतका ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती दर दोन महिन्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन नवे व्याजदर जाहीर करते. यावेळी रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करेल, असा अंदाज होता. मात्र, RBIकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

दहा हजारांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर कोणती बँक देतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सर्वकाही

बाँडसच्या माध्यमातून एसबीआयने उभारला 6000 कोटींचा निधी; काय असतात AT1 बाँड?

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव