गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव खिजाडिया. या गावातील शेतकऱ्याच्या एका मुलाला लहानपणापासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याची खूप आवड होती. तो अनेकदा आईला स्वयंपाकघरात मदत करत होता. त्याचे कुटुंब शेतीच्या कामात गुंतले होते. परंतु त्यांना शेतीतून उत्पन्न मर्यादित मिळवते होते. त्यामुळे त्याने खाद्यपदार्थ बनवण्याच्या आपला छंदालाच करिअर का करू नये, असा विचार केला. मग तो प्रसिद्धा युट्यूबर झाला. त्याने कधी विचारही केला नसेल, अशी संधी त्याला मिळाली. निकुंज वसोया याने बनवलेल्या कठियावाडी व्यंजनाच्या प्रेमात देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी पडले. त्यांनी त्याला अनंत आणि राधिकाच्या लग्नात व्यंजन बनवण्यासाठी बोलवून घेतले होते. आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अंबानीसुद्धा त्याने बनवलेल्या व्यंजनाच्या प्रेमात पडले आहेत.
गुजरातमधील निकुंज वसोया याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. शेतकऱ्याच्या घरातील मुलाने विविध व्यंजन बनवण्यात चांगले यश मिळवले आहे. तो आज प्रसिद्ध युट्यूबरच नाही तर अंबानीसारख्या अनेक श्रीमंतांच्या परिवारांमधील लग्नात आलेल्या अनेक खवय्यांना त्याने तृप्त केले आहे. 20 वर्षांपूर्वी सुरु केलेले करियरमध्ये मोठे यश निकुंज याने मिळवले आहे.
2013 मध्ये निकुंज कंपनी सेक्रेटरीचा अभ्यास करत होता. पण विविध व्यंजन बनवण्याची आवड असल्याने त्यात त्याचे मन रमले नाही. त्याने शिक्षण अर्धवट सोडले आणि कुकिंग शो सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याने यूट्यूबवर स्वतःचे चॅनल सुरू केले. या चॅनलला ‘क्रेझी फॉर इंडियन फूड’ असे नाव दिले. त्याने त्याच्या शेतातून तोडलेल्या ताज्या भाज्यांचा वापर करून पारंपरिक काठियावाडी पदार्थ बनवायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला.
द बेटर इंडियाच्या अहवालानुसार, त्याचे व्हिडिओ लोकांना अधिक आवडतात. कारण तो त्यांना शेतीपासून स्वयंपाकापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया दाखवतो. आज त्याच्या चॅनेलवर 5.9 लाखांहून सब्रकाईबर आहेत. त्याचा सर्वात लोकप्रिय व्हिडिओ 9.1 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. वेगवेगळ्या भाषेत त्याचे सहा चॅनल आणि एक वेबसाईट आहे.
निकुंज याची प्रतिभा अंबानी परिवाराला आवडली. यामुळेच त्याला अनंत अंबानी राधिका मर्चेंट यांच्या वडोदरामध्ये आयोजित प्री-वेडिंग कार्यक्रम अन् मुंबईतील लग्नातही बोलवले. तो जामनगरी शेव, ममरा लिली चटनी, देसी शेव तमेरा शाक आणि बाजरा रोटला यासारखे पदार्थ कुशलतेने बनवतो.