जिओ कंपनी आपल्या ग्राहकांना प्रत्येक वेळेला एकापेक्षा एक प्लॅन देत असते. हे प्लॅन वेगवेगळ्या वैद्यतेस सह असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जिओच्या बहुतेक प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमाचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते. जिओच्या नवीन वर्षाच्या प्लॅनमध्ये तुम्ही 2025 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 दिवसांची वैधता मिळत आहे. दररोज हाय स्पीड डेटा वापरण्याची संधी मिळत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर कोणते फायदे मिळणार आहे. जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती.
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला उत्कृष्ट फायदे मिळतात. ज्याचा लाभ तुम्ही 200 दिवसांपर्यंत घेऊ शकतात. हा प्लॅन 200 दिवसांच्या वैधतेसह येतो. केवळ 2025 रुपये खर्च करून तुम्हाला 200 दिवसांसाठी एकूण 500 जीबी मोफत डेटा मिळेल. तुम्ही दररोज 2.5 GB हायस्पीड डेटा वापरू शकता.
1. यासोबतच तुम्हाला या प्लॅनमध्ये ऑफलाईन एसएमएस सुविधाही मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस मिळत आहेत.
2. कंपनीने ग्राहकांच्या मनोरंजनाची पुरेपूर काळजी घेतली आहे. यामध्ये तुम्हाला Jio Cinema कडून Jio TV आणि Jio Cloud चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.
3. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग फायद्यासह तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय तासन्तास तुमच्या मित्रांशी किंवा प्रियजनांशी बोलू शकता.
4.Jio Cinema हे तुमच्यासाठी संपूर्ण मनोरंजन पॅकेज आहे. यावर तुम्ही 350 पेक्षा जास्त चित्रपट आणि 500 पेक्षा जास्त अधिक टीव्ही शो पाहू शकता.
तुमच्या सध्याच्या रिचार्जची रोजची वैधता संपल्यानंतर तुम्ही या ऍड ऑन प्लानची मदत घेऊ शकता. हे फक्त तुमच्या असलेल्या प्लॅनमध्ये तुम्हाला हाय स्पीड डेटा देतात. ऍड ऑन प्लॅनला बूस्टर प्लॅन असेही म्हणतात.
जिओने आणखी एक प्लान दिला आहे. तुम्ही 2025 रुपयांचा प्लॅन खरेदी केला तर रिलायन्स जिओकडून EasemyTrip चे व्हाउचर मिळणार आहे. याचा वापर तुम्हाला फ्लाइट तिकीट बुकिंगवर करता येईल. या व्हाउचरच्या माध्यमातून तुम्ही फ्लाइट बुकिंगवर 1500 रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकता.
या शिवाय तुम्ही जिओकडून कपडे खरेदी केल्यास किमान 2999 रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची सूट मिळेल. तसेच स्विगीवर 150 रुपयांचे व्हाउचर दिले जात आहे. त्यामुळे स्विगीवर रिडीम करू शकता आणि 150 रुपयांच्या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता.