आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आपल्या अनोख्या जीवनशैलीमुळे ओळखले जातात. त्यांच्या आलिशान घरात असंख्य कर्मचारी आहेत. मुकेश अंबानी यांचा संपूर्ण परिवार शाकाहारी आहे. त्यामुळे त्यांचा घरी असणारा शेफ शाकाहारी व्यंजन करण्यात तरबेज असतो. त्यांच्या घरातील शेफला महिन्याला दोन लाख रुपये वेतन आहे. तसेच आरोग्य विमाची सुविधा आहे. कर्मचाऱ्याच्या परिवारास शिक्षणासाठी मदत केली जाते. डॉक्टर, इंजिनिअरपेक्षा जास्त पगार मुकेश अंबानी यांच्या शेफला आहे.
नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मुकेश अंबानी यांचे शेड्यूल व्यस्त असते. त्यानंतर ते परिवारासोबत रात्रीचे जेवण करतात. त्यांची दिनचर्याचा तो खास भाग आहे. परिवारातील सर्व सदस्य एकत्र जेवण करतात. मुकेश अंबानी यांना स्ट्रीट फूड आवडते. शेवपुरी, चटपटे स्नॅक्स ही त्यांना विशेष आवडते. ते अनेक वेळा मुंबईतील प्रसिद्ध रेस्टोरेंट स्वाती स्नॅक्समधून खाद्यपदार्थ मागवतात. त्यांच्या घरी नियमित चपती, दाळ, भात हे भारतीय भोजन असते.
मुकेश अंबानी यांना घरचे जेवण आवडते. त्यात गुजराती दाल आणि राजमा त्यांच्या विशेष आवडीचे पदार्थ आहेत. ते डायट फॉलो करतात. जेवणात नेहमी स्वादापेक्षा पौष्टिक पदार्थांना त्यांचे प्राधान्य असते. हिरव्या भाज्या, सलाद त्यांच्या जेवणात नेहमी असते.
अंबानी परिवारास भारतीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पदार्थांचे व्यंजन आवडतात. विशेष प्रसंगी त्यांची कुशल कुकींग टीम ही व्यंजन करण्यात काहीच कसर सोडत नाही. पारंपारिक आणि आधुनिक खाण्याच्या सवयींचे हे मिश्रण त्यांच्या घरी असते.
मुकेश अंबानी यांनी त्यांच्या घरी असलेल्या शेफला भरभक्कम पगार दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांच्या अँटिलियातील शेफला दर महिन्याला सुमारे 2 लाख रुपये मिळतात. याशिवाय त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा दिले आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांचा शिक्षणाचा खर्चही केले जाते.