मुकेश अंबानी हे आशिया खंडातील श्रीमंत उद्योगपती आहेत. लवकरच ते देशातील जनतेला स्वप्नातल घर बनवण्यासाठी मदत करणार आहेत. NBFC कंपनी जियो फायनेंशियल सर्विसेस लवकरच सर्वसामान्यांना होम लोन देण्याचा प्लान बनवत आहे. त्यासाठी कंपनीने काम सुरु केलय. मुकेश अंबानी यांनी मागच्यावर्षी एनबीएफसी कंपनी जियो फायनेंशियल सर्विसेस सुरु केली. शुक्रवारी जियो फायनेंशियलचा शेअर एक टक्क्यापेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने कशा पद्धतीचा प्लान बनवलाय जाणून घ्या.
जियो फायनेंशियल सर्विसेस ही बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे. जियो फाइनेंशियल सर्विसेस लिमिटेडने शुक्रवारी सांगितलं की, ते होम लोन सर्विस सुरु करण्याच्या फायनल फेजमध्ये आहेत. त्यांनी टेस्टिंग म्हणून (बीटा) सुरु केलय. त्याशिवाय कंपनी संपत्तीवर लोन आणि सिक्योरिटीजवर लोन सारखे दुसरे प्रोडेक्टही सादर करणार आहे,
संपत्तीवर लोन देणार का?
शुक्रवारी पहिली वार्षिक बैठक झाली. त्यानंतर शेयरधारकांना संबोधित केलं. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ हितेश सेठीया म्हणाले की, “आम्ही होम लोन सेवा सुरु करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. चाचणी म्हणून आम्ही काही गोष्टी सुरु केल्या आहेत” संपत्तीवर लोन आणि सिक्योरिटीज वर लोन सारखी उत्पादन सुद्धा आहेत.
कंपनीच्या शेअरचा भाव काय?
एकदिवस आधी शुक्रवारी जियो फायनेंशियल सर्विसेसच्या शेयर्समध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण पहायला मिळाली. बीएसईच्या आकड्यानुसार 1.21 टक्के घसरणीसह शेअर 321.75 रुपयावर बंद झाला. दिवसभरात कंपनीचा हा शेयर 320.50 रुपये या लोअर लेवलला सुद्धा पोहोचला होता. जियो फायनेंशियल शेयरचा 52 आठवड्यातील हाय 394.70 रुपये आहे. कंपनीच मार्केट कॅप 2 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे.