Mukesh Ambani Security Salary: देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांना Z प्लस सुरक्षा दिली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत एनएसजी कमांडो आणि सीआरपीएफचे जवान असतात. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले गार्ड मुकेश अंबानी यांची सुरक्षा करतात. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत 10 पेक्षा जास्त एनएसजी कमांडो आणि 50 पेक्षा जास्त सीआरपीएफ जवान तैनात असतात. तसेच मुंबई पोलीस दलाचे कर्मचारी त्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहे. सरकारकडून मुकेश अंबानी यांना ही सुरक्षा मिळाली असली तरी त्याचा खर्च ते स्वत: उचलतात. सुरक्षेचा खर्च ते सरकारकडे जमा करत असतात. मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत असणाऱ्या कमांडोना पगार किती असणार…
मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत असणाऱ्या कमांडोचा पगार पदानुसार ठरलेला असतो. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत दहा पेक्षा जास्त एनएसजी कमांडो आहेत. या एनएसजी कमांडोमधील ग्रुप कमांडरला महिन्याला 1,00,000 ते 1,25,000 रुपये वेतन मिळते. तसेच स्क्वॉड्रन कमांडरला 90,000 ते 1,00,000 रुपये मिळतात. टीम कमांडरला 80 हजार ते 90 हजार रुपये मिळतात.
मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत 50 पेक्षा जास्त सीआरपीएफ जवान असतात. त्यांचा पगारही पदानुसार वेगवेगळा असतो. तसेच महाराष्ट्रात असताना मुंबई पोलीस किंवा इतर राज्यात गेल्यावर त्या राज्यातील पोलिसांची सुरक्षाही त्यांना असते.
Z प्लस सुरक्षा असलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी नॅशनल सिक्योरिटी गार्ड म्हणजेच एनएसजी कमांडो असतात. हे देशातील सर्वात पावरफुल कमांडो आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ते काम करतात. एनएसजी कमांडोची निवड सीआरपीएफ, आयटीबीपी, बीएसएफ आणि सीआईएसएफ अशा अर्धसैनिक दलातून होते. त्यांना 90 दिवसांची कठोर ट्रेनिंग असते. नॅशनल सिक्योरिटी गार्डची निर्मिती 16 ऑक्टोंबर 1984 रोजी करण्यात आली आहे. एनएसजी कमांडो जर्मनीच्या GSG9 पातळीवर करण्यात आली. 26/11 मुंबई हल्ल्यात एनएसजी कमांडोची भूमिका महत्वाची राहिली होती.