मुकेश अंबानी यांची बद्रीनाथ-केदारनाथ यात्रा, मंदिराला इतक्या कोटींचे केले दान

| Updated on: Oct 21, 2024 | 5:45 PM

Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे चारधाम यात्रेवर आहेत. त्यांनी रविवारी बद्रीनाथ - केदारनाथ मंदिराला भेट दिली. केदारनाथ हे मंदिर हिंदूंचे सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. येथील प्राचीन मंदिरात भगवान शिवलिंग आहे. येथे दरवर्षी हजारो लोकं दर्शनासाठी येत असतात. मुकेश अंबानी यांनी यावेळी मंदिराला मोठे दान देखील दिले आहे.

मुकेश अंबानी यांची बद्रीनाथ-केदारनाथ यात्रा, मंदिराला इतक्या कोटींचे केले दान
Follow us on

भारतातील मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे सध्या चार धाम यात्रेवर आहेत. मुकेश अंबानी यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम येथे जाऊन शंकराची पूजा केली. मुकेश अंबानी यांनी रविवारी बद्रीनाथ-केदारनाथ धाम यात्रेदरम्यान देणगी दिल्याचे देखील वृत्त आहे. NBC-TV18 च्या वृत्तानुसार, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) मुकेश अंबानी यांचे जोरदार स्वागत केले. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिराला ५ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे देखील अहवालात म्हटले आहे.

बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामसाठी हजारो लोकं दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी अत्यंत साधेपणाने पांढरा कुर्ता पायजमा घालून दर्शनसाठी पोहोचले होते. मुकेश अंबानी यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था होती. मुकेश अंबानी यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

नयनरम्य हिमालयीन प्रदेशात वसलेले बद्रीनाथ आणि केदारनाथ धाम हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे. कारण ते पवित्र चार धाम यात्रेचा भाग आहे. मुकेश अंबानी यांनीही गेल्या वर्षी देखील आपल्या कुटुंबासह या मंदिरांना भेट दिली होती. 2023 मध्ये त्यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसोबत या मंदिरांना भेट दिली होती.

याआधीही मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांनी बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामला मोठी देणगी दिली आहे. 2022 मध्ये अंबानी कुटुंबियांनी बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामसाठी पाच कोटी रुपयांचे दान दिले होते. मंदिरांना भेटी देण्यासाठी आणि धार्मिक स्थळांवर देणगी देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अंबानी कुटुंबाने यापूर्वी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुंबईतील लालबागच्या राजाला १५ कोटी रुपयांचा २० किलोचा सोन्याचा मुकुट दान केला होता.

केदारनाथ मंदिर हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित आहे. भगवान शिव यांचं ते मंदिर आहे. येथील वातावरणामुळे मंदिर केवळ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच दर्शनासाठी उघडले जाते. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना 16 किलोमीटरची चढाई पूर्ण करावी लागते.

केदारनाथ धाम हे हिंदूंचं महत्त्वाचं धार्मिक स्थान आहे. कात्युरी शैलीतील दगडांनी बनवलेलं हे मंदिर खूपच प्राचीन आहे. पांडवांचे नातू महाराज जनमेजया यांनी हे मंदिर बांधले असल्याचं मानले जाते. 2023 मधील केदारनाथ पूर कोणीही विसरू शकत नाही, अचानक आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे मंदिराच्या आजूबाजूची घरे कोसळली पण मंदिराचेही काहीही नुकसान झाले आहे.