मुंबई: रायसकरन हा कलेच्या माध्यमातून विलासी जीवन जगण्याची शाश्वतता देणारा रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रातील भारतातील सर्वोत्तम ब्रँड आहे. रास्करनला ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन इंक (किंवा “GBCI”) द्वारे अंधेरी पूर्व येथील अत्याधुनिक टेक पार्कसाठी LEED® प्लॅटिनम प्रमाणपत्र (Platinum certification) प्राप्त झाले आहे. 8 जुलै 2022 रोजी मुंबईत रायसकरन टेक पार्कमध्ये (Raiaskaran Tech Park ) शानदार मॅजेस्टिक पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी जीबीसीआयचे एमडी, एसई आशिया गोपालकृष्णन पी. आणि मेना यांच्या हस्ते रास्करनचे संचालक युवराज एस. राजन यांनी प्रतिष्ठेचे LEED प्लॅटिनम प्रमाणपत्रं देऊन गौरवणण्यात आले. या पुरस्काराने रायसकरनचे शाश्वततेसाठीचे सर्मपण अधोरेखित झाले आहे. रायसकरन टेक पार्क ही जगातील अग्रणी कंपन्याना सेवा पुरवते. तसेच या कंपनीची महाराष्ट्रातील पहिल्या तीन व्यावसायिक खासगी आयटी पार्कपैकी एक महत्त्वाची कंपनी म्हणून नोंद झाली आहे.
जीबीसीआय (GBCI) हे भारतातील हरित इमारतींची निर्मिती, उत्कृष्ट शाश्वत डिझाइन, बांधकाम आणि ऑपरेशन प्राधिकरण आहे. हे प्राधिकरण लीडरशीप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन (LEED) ग्रीन बिल्डिंग ग्रेडिंग सिस्टमचा एक भाग असून त्यावर यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (‘USGBC’)कडून स्वतंत्रपणे देखरेख केली जाते. LEED प्रमाणन हे दर्शविते की, यातून शाश्वत हरित इमारतींच्या निर्मितीच्या पद्धतींना प्राधान्य देण्याची सुविधा देते.
युवराज यांना गोपालकृष्णन पी. यांच्यासमवेत हा पुरस्कार औपचारिकपणे जाहीर करताना खूप अभिमान वाटला. या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्यात LEED प्लॅटिनम प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर युवराज एस. राजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. युवराज एस. राजन म्हणाले की, “जीबीसीआयकडून रायसकरन टेक पार्कला हे अत्यंत प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. तसेच गोपालकृष्णन या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या मनात त्यांच्याबद्दलची विनम्रतेची भावना निर्माण झाली आहे. रायसकरन येथे आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. या पुरस्कारामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील हरित निर्मिती आणि आमची शाश्वततेबाबतची बांधिलकी दाखवून दिली आहे. रायसकरनमध्ये कला, भारतीय विलासिता आणि शाश्वतता आपल्या सर्वांसाठी मौलिक असून ते देण्याचं काम आपण करत आहोत. आम्ही आपली समृद्ध भारतीय संस्कृती लक्षात घेऊन आमचं सर्वांपेक्षा वेगळं असं स्थान तयार करत आहोत. आमच्या संरचनेत जगभरातील कला आणि डिझाइन आदींचा समावेश आहे. आमची LEED प्लॅटिनम मान्यता आमच्या कर्मचारी आणि ग्राहकांना उत्पादक, शाश्वत आणि कामासाठी निर्मळ वातावरण देण्यासाठी आमचे समर्पण दर्शवते.”
गोपालकृष्णन पी (एमडी, जीबीसीआय, एसई आशिया आणि मिडल इस्ट मार्केट्स) म्हणाले की, “खऱ्या अर्थाने ही मौलिक अशी कामगिरी आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल मी रायसकरन समुहाचे मनापासून अभिनंदन करतो. रास्करन समुहाने जे करून दाखवलं ते अविश्वसनीय असंच आहे. आपला देश हरित इमारतीच्या मोहिमेत सर्वात अग्रेसर आहे आणि त्यात रायसकरन सारखे डेव्हल्पर अत्यंत महत्त्वाचे योगदान देत आहेत. शाश्वततेचं हे आंदोलन LEED प्रमाणित इमारतींसाठी धन्यवाद व्यक्त करत आहे. येत्या काही वर्षात निवासी हरित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. एक शाश्वत पाया रचण्यासाठी LEED रायसकरन सारख्या बिल्डर आणि राज्य सरकारांशी मिळून सहकार्य करेल. भारतात हरिततेची आवश्यकता निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात इथे अनेक हरित प्रकल्प सुरू होतील याचा आम्हाला विश्वास आहे. त्यात विकासाला चालना मिळेल आणि हरित रोजगारांची निर्मिती होईल.”