नवी दिल्ली : म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक करण्याकडे अलीकडच्या काळात कल वाढीस लागला आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचे अधिकाधिक फायदे आहेत. मात्र, सर्वात मोठा फायदा म्हणजे म्युच्युअल फंडद्वारे कर्जाचा पर्याय उपलब्ध असतो. 50 हजार ते 3 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज म्युच्युअल फंड युनिटवर उपलब्ध होते. इक्विटी आणि डेब्ट गुंतवणुकीच्या विविध म्युच्युअल फंड स्कीमवर लोन मिळू शकते. म्युच्युअल फंड वर लोनची सुविधा पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. अनेक बँका आणि एनबीएफसी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेल्या रकमेवर कर्ज उपलब्ध करते. विशेष म्हणजे म्युच्युअल फंडवर कर्जाची प्रक्रिया (Mutual Fund Loan Process) अत्यंत सुलभ आहे.
म्युच्युअल फंड युनिटवर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँक किंवा एनबीएफसीकडे कर्जाचा करार करावा लागेल. याद्वारे तुमचे म्युच्युअल फंड युनिट गहाण ठेवले जाते. बँक किंवा एनबीएफसी यासापेक्ष तुम्हाला लोन प्रदान करते. युनिटच्या बाजार मूल्याच्या आधारावर लोन मंजूर केले जाते.
म्युच्युअल फंडवर उपलब्ध लोन ओवरड्राफ्ट सुविधेच्या स्वरुपात मिळते. निकडीच्या वेळी गुंतवणुकदार अॅपच्या माध्यमातून आवश्यक लोन रक्कम प्राप्त करू शकतात. लोनसाठीचा अर्ज केल्याबरोबरच गुंतवणुकदाराच्या बँक खात्यात रक्कम थेट वर्ग केली जाते. तुम्हाला यासाठी अॅप अँड्रॉईड स्टोअर किंवा आयओएस अॅप स्टोअर वर उपलब्ध असेल.
म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूकीचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याद्वारे गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्मिती, नियमित उत्पन्न प्राप्ती इ. उदिष्टे निश्चितपणे साध्य करू शकतात.