नरेंद्र मोदी यांचा एका शब्दाचा मेसेज अन् चार दिवसांत पश्चिम बंगालमधील 2000 कोटींचा प्लांट गुजरातमध्ये

| Updated on: Oct 11, 2024 | 10:49 AM

Ratan Tata and narendra modi: जेव्हा रतन टाटा यांनी पश्चिम बंगालमधील नॅनो प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांना एक SMS पाठवला. तो SMS होता 'Welcome'. त्यानंतर नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आला. एका रुपयाचा SMS काय करु शकतो? हे त्यातून दिसून येते.

नरेंद्र मोदी यांचा एका शब्दाचा मेसेज अन् चार दिवसांत पश्चिम बंगालमधील 2000 कोटींचा प्लांट गुजरातमध्ये
ratan tata and narendra modi
Follow us on

Ratan Tata Passed Away: भारतीय उद्योग विश्वाचा चमकता तारा टाटा सन्सचे मानद चेअरमन रतन टाटा यांचे 9 ऑक्टोंबर रोजी निधन झाले. त्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. टाटा ग्रुपने देशातच नाही विदेशातही यशाचा डंका वाजवला. ते आता आपल्यात राहिले नसले तरी त्यांनी केलेल्या कामातून सदैव ते सोबत असणार आहे. रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नॅनो कार लॉन्च केली होती. त्यासंदर्भातील किस्सा चांगलाच रंजक आहे.

चार दिवसांत प्लांट शिफ्ट

2008 मधील ही घटना आहे. रतन टाटा यांनी पश्चिम बंगालमध्ये 2000 कोटींचा नॅनोचा प्लांट उभारण्याची घोषणा केली. परंतु तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोठा विरोध केला. त्यावेळी हिंसाचारही झाला. त्यांच्या या प्लांटला बंगालमध्ये विरोध झाला. त्यानंतर 3 ऑक्टोंबर 2008 रोजी टाटा यांनी नॅनो प्रकल्प पश्चिम बंगालमधून दुसऱ्या राज्यात नेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पुढील चार दिवसांत पश्चिम बंगालमधील प्लांट गुजरातमधील साणंद येथे शिफ्ट झाला.

नरेंद्र मोदी यांनी सांगितला तो किस्सा

गुजरातमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी होते. त्यांनी पश्चिम बंगालमधील प्लांट गुजरातमध्ये कसा आला, याचा किस्सा एका भाषणात 2010 मध्ये सांगितला होता. नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, जेव्हा रतन टाटा यांनी पश्चिम बंगालमधील नॅनो प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांना एक SMS पाठवला. तो SMS होता ‘Welcome’. त्यानंतर नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आला. एका रुपयाचा SMS काय करु शकतो? हे त्यातून दिसून येते.

हे सुद्धा वाचा

विदेशात प्लांट जाऊ दिला नाही

नरेंद्र मोदी म्हणाले, नॅनो प्रकल्पासाठी शक्य ती सर्व मदत आम्ही केली. गुजरातमधील अधिकाऱ्यांना सांगितले, हा प्रकल्प देशाबाहेर जाऊ देऊ नका. त्यानंतर गुजरात सरकारने प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर केल्या. रतन टाटा यांनी गुजरात सरकारच्या या कामाचे कौतूक केले होते. गुजरातने आम्हाला जे पाहिजे, ते सर्व दिले. गुजरातमधील कामाचा वेग कार्पोरेट संस्कृतीशी मिळत आहे.