मुंबई : 1 जुलै अर्थात आजपासून बँकिंगसह विविध क्षेत्रात नवे नियम लागू झाले आहेत. स्टेट बँक अर्थात SBI ने ही अनेक नियमांत बदल केले आहेत. काही खातेधारकांच्या चेकबुकपासून ते एटीएममधून पैसे काढण्यापर्यंत नियम बदलले आहेत. काही बँकांनी IFSC कोडही बदलले आहेत. काही बँक दुसऱ्या बँकांत विलीन होत असल्याने IFSC बदलाचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला बँकिंग व्यवहारासाठी IFSC नंबर माहिती असणे आवश्यक आहे. (New IFSC numbers from today bank updated new numbers canara bank, bank of baroda)
बँका आपल्या ग्राहकांना IFSC नंबरची सातत्याने माहिती देत असते. त्यामुळे ग्राहकांनी जागरुक राहून IFSC कोड अपडेट करावा. आजपासून अनेक बँकांचे IFSC कोड बदलले आहेत. त्यामुळे ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करताना, अडचणी येऊ शकतात. कोणकोणत्या बँकांचे IFSC नंबर बदलले?
नुकतंच देशातील अनेक बँकांचं दुसऱ्या बँकांमध्ये विलिनीकरण झालं आहे. यामध्ये देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनाएटेड बँक ऑफ इंडिया (UBI), सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉरपोरेशन बँक आणि इलाहाबाद बँक यांचा समावेश आहे.
देना बँक आणि विजया बँकेचं विलीनकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं आहे. तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायडेट बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झालं आहे. याशिवाय आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकेचं विलिनीकर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालं आहे. तर इलाहाबाद बँक इंडियन बँकेत तर सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत विलीन झाली आहे.
या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला संबंधित बँकेचा IFSC नंबर जाणून घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला फोन बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, SMS द्वारे किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन IFSC नंबर जाणून घ्यावा लागेल. तुम्हाला जर कोणी ऑनलाईन पैसे पाठवत असेल तर त्या व्यक्तीकडे तुमच्या बँकेचा IFSC नंबर असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला या बँकांचे नवे चेकबुक घ्यावे लागेल. जे नव्या IFSC नंबरसह असतील.
संबंधित बातम्या
भारतात 1 जुलैपासून ‘हे’ 9 मोठे बदल होणार, नुकसान टाळण्यासाठी वेळ काढून वाचा
Home Loan : मोठं घर खरेदी करायचंय तेही कमी डाऊन पेमेंट आणि ईएमआयमध्ये, ‘ही’ पद्धत नक्की वापरा