New IT Rules: नवीन आयटी नियमांनुसार ट्विटरने नियुक्त केला कम्पलायन्स अधिकारी

| Updated on: Sep 24, 2021 | 6:43 PM

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, "ट्विटरने असे म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांना (CCO, नोडल अधिकारी आणि आरजीओ) कंपनीचे कर्मचारी म्हणून नियुक्त केले गेलेय, प्रासंगिक कर्मचारी म्हणून नाही."

New IT Rules: नवीन आयटी नियमांनुसार ट्विटरने नियुक्त केला कम्पलायन्स अधिकारी
Twitter
Follow us on

नवी दिल्ली : मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने नवीन आयटी नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी (आरजीओ) आणि नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात दिली.

या कर्मचाऱ्यांची कंपनीचे कर्मचारी म्हणून नियुक्ती

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “ट्विटरने असे म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांना (CCO, नोडल अधिकारी आणि आरजीओ) कंपनीचे कर्मचारी म्हणून नियुक्त केले गेलेय, प्रासंगिक कर्मचारी म्हणून नाही.”

नवीन आयटी नियमांचे पालन करण्याची शेवटची संधी

आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विटरने या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या पदांची माहिती दिलीय. 4 ऑगस्ट 2021 रोजी त्यांची नोकरी सुरू झाल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे जुलैमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने ट्विटरला नवीन आयटी नियमांचे पालन करण्याची शेवटची संधी म्हणून एक आठवड्याची मुदत दिली होती.

25 मेपासून नवीन आयटी नियम अस्तित्वात

नवीन नियम 25 मेपासून लागू झालेत. या अंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. अशा सर्व सोशल मीडिया कंपन्यांसाठी ज्यांच्या वापरकर्त्यांची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना तक्रार अधिकारी नेमणे बंधनकारक आहे. याशिवाय या कंपन्यांना मुख्य अनुपालन अधिकारी आणि नोडल संपर्क व्यक्तीची नेमणूक करावी लागेल.

ट्विटर लवकरच 280 वर्ण मर्यादा वाढवण्याची शक्यता

ट्विटरने गुरुवारी बरीच नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली, त्यापैकी बहुतेक क्रिएटर-ओरिएंटेड होते. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने असेही म्हटले आहे की, ते 280-वर्णाची मर्यादा वाढवणे आणि वापरकर्त्यांना स्वतःला व्यक्त करण्यास सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. एका निवेदनात, ट्विटरचे ग्राहक उत्पादन प्रमुख कायवन बॅकूर म्हणाले, “आम्हाला वाटते की ट्विटर हा इंटरनेटचा संभाषणात्मक स्तर असू शकतो. आम्ही या योजनेच्या दिशेने खूप प्रगती केली आहे.”

ट्विटर आणखी काही नवीन फिचर्स आणणार

ट्विटर स्पेससाठी नवीन वैशिष्ट्ये आणण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये स्पेसवर ऑडिओ चर्चा आणि प्रोग्राम होस्ट करणाऱ्या लोकांना आर्थिक सहाय्य देणारा प्रोग्राम समाविष्ट आहे. क्रिएटिव्ह मुद्रीकरणासाठी ट्विटरच्या प्रॉडक्ट लीडर एस्थर क्रॉफर्ड म्हणाल्या, “स्पेस सारखे फॉरमॅट लोकांना पूर्णपणे नवीन मार्गाने संभाषणात सामील होण्यास प्रोत्साहित करतात आणि ते सुरू ठेवण्यासाठी आम्ही खरोखर उत्साहित आहोत.”

संबंधित बातम्या

नोकरदार 8 गोष्टींसाठी त्यांचे पीएफचे पैसे काढू शकतात, जाणून घ्या..

वाढत्या महागाईमुळे तुमच्यावरील कराचा बोजा कमी होणार, कसे ते जाणून घ्या

New IT Rules: Twitter appoints compliance officer under new IT rules