नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने (RESERV BANK OF INDAI) रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे व्याज दरवाढीचा थेट फटका गृहकर्ज महाग होण्यावर होणार आहे. त्यामुळे घराच्या मागणीत घट होण्याचा अंदाज बांधकाम वर्तृळातून वर्तविण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रेपो दरात 40 बेसिस पॉईंटने (BASIS POINT) वाढ केली आहे. नवीन सुधारणेनंतर रेपो दर 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. बांधकाम क्षेत्राची मदार बहुतांश बाह्यकर्जावर अवलंबून असते. अधिकाधिक खरेदी बँक कर्जाच्या (BANK LOAN) माध्यमातून केली जाते. महागड्या कर्जाचा थेट परिणाम खरेदीदारांच्या क्षमतेवर होण्याची शक्यता आहे. उद्योगक्षेत्राने यापूर्वीच स्टील व सिमेंटच्या वाढत्या किंमतीमुळे खरेदीदारांची संख्या घटण्याची चिंता व्यक्त केली होती.
बांधकाम आस्थापनांची शीर्ष संघटना क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटौदिया यांनी रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीवर भाष्य केलं आहे. कोविड काळात रेपो दर स्थिर राहिल्यामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो दरात आकस्मिक बदलामुळे बांधकाम क्षेत्राच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. क्रेडाईनं रिझर्व्ह बँकेकडे दरात बदल न करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. महागडे कर्ज, कच्च्या साहित्यातील भाववाढीमुळे बांधकाम क्षेत्राचा वेग मंदावू शकतो.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात 0.4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नव्या बदलासह रेपो दर 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दर वाढीमुळे अन्य बँकांच्या कर्जदरात वाढ होणे निश्चित मानले जात आहे.
रिझर्व्ह बँकेद्वारे अखत्यारीतील बँकांना भाग भांडवलाचा पुरवठा केला जातो. त्या दरास रेपो दर म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराचा परिणाम अन्य बँकांच्या दरावर थेट जाणवतो. रिझर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे बँकांच्या दरात कोणतीही वाढ नोंदविली गेली नव्हती. रेपो दरात वाढ केल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक ठरते. रेपो दरात वाढ झाल्यास लेडिंग रेटमध्ये निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे आगामी काळातील रिझर्व्ह बँकांच्या धोरणांकडे लक्ष लागले आहे.