नवी दिल्ली : नोकरदारांच्या पगाराबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने नवी वेतन नियमावली विधेयक (New Wage Code) लागू करण्यास तूर्तास थांबवलं आहे. त्यामुळे आता तुमच्या पगारावर (Salary) कोणताही परिणाम होणार नाही. जर हे विधेयक नव्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून लागू केलं असतं, तर तुमच्या हातात येणारा पगार आणखी कपात झाला असता. हे विधेयक लागू झाल्यास खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार होता. (New wage code will not implement from 1st april No change in your salary structure for now)
केंद्र सरकारने सध्या नवी वेतन नियमावली विधेयक (New Wage Code) तूर्तास लागू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे उद्यापासून हे विधेयक लागू होणार नाही.
#JustIn: New wage code deferred. No change in your salary structure for now. pic.twitter.com/SVI7s1aitZ
— Money9 (@Money9Live) March 31, 2021
EPFO बोर्ड मेंबर आणि भारतीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी वीरजेश उपाध्याय यांनी ‘मनी 9’ सोबत बोलताना यावर अधिक स्पष्टपणे सांगितलं. “सरकारकडून जोपर्यंत नवं नोटिफिकेशन जारी होत नाही, तोपर्यंत नव्या निर्णयाची अंमलबाजवणी होत नाही. 1 एप्रिलपासून नवी वेतन नियमावली लागू होणं कठीण आहे”.
नवं वेतन नियमावली विधेयक लागू झाल्यास नोकरदारांच्या हातात येणाऱ्या पगाराच्या रकमेवर परिणाम होईल. त्यामुळे सर्व प्रकारच्या कपातीनंतर हातात येणारा पगार कमी होणार आहे. नव्या बिलानुसार कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार म्हणजेच कॉस्ट टू कंपनीच्या (CTC) 50 टक्के रक्कम बेसिक आणि 50 टक्के भत्ता अशा रुपात द्यावी लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराची 50 टक्के रक्कम आधीच बेसिक आहे त्यांच्यावर या नव्या नियमांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्यांची बेसिक सॅलरी एकूण रकमेच्या 30 ते 40 टक्के आहे, त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात मात्र कपात होईल.
जर एखाद्या नोकरदार व्यक्तीचा महिन्याचा पगार (CTC) 10,000 रुपये आहे तर त्याच्या या पगाराची 50 टक्के म्हणजेच निम्मी रक्कम ही बेसिक ठेवावी लागेल. यानुसार त्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 5 हजार रुपये होईल आणि याच पगाराच्या 12 टक्के म्हणजेच 600 रुपये PF म्हणून कापले जातील. या टप्प्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातील रक्कम कपात होणार असली तरी ती रक्कम कर्मचाऱ्यांच्याच मालकीची असणार आहे. विशेष म्हणजे इतकीच रक्कम पुन्हा कंपनीलाही यात टाकावी लागणार आहे. त्यामुळे एकूणच कपात होत असली तरी हे नवे नियम कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत.
कंपनीने 5 टक्के ग्रॅच्युटीची रक्कम कापली तर 5 हजार रुपयांमधून 250 रुपये ग्रॅच्युटी म्हणून कपात होईल. म्हणजेच 5,000 बेसिक पगारातून नोकरदाराच्या हातात 4150 रुपये शिल्लक राहतील. अशावेळी 10 हजार रुपये पगारवाल्या नोकरदाराच्या हातात 4150 (बेसिक) + 5000 (इतर भत्ते) = 9150 रुपये येतील.
New Wage code benefits : कोणत्याही कंपनीमार्फत कर्मचार्यांवर केलेला खर्च म्हणजे सीटीसी असतो. हे कर्मचार्यांचे संपूर्ण वेतन पॅकेज आहे. सीटीसीमध्ये मासिक मूलभूत वेतन, भत्ते, रिइम्बर्समेंट समाविष्ट आहेत. त्याचबरोबर ग्रॅच्युइटी, वार्षिक व्हेरिएबल वेतन, वार्षिक बोनस इत्यादींचा वार्षिक आधारावर समावेश केला जातो. कर्मचार्यांच्या हातात येणाऱ्या पगाराची रक्कम आणि सीटीसीची रक्कम कधीही एकसमान नसते. सीटीसीमध्ये बरेच घटक आहेत, त्यामुळेच ते वेगवेगळे आहेत. सीटीसी = एकूण पगार + पीएफ + ग्रॅच्युइटी
संबंधित बातम्या
नोकरदारांसाठी नवी ‘पगार व्यवस्था’, 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता, तुमच्यावर काय परिणाम होणार?
1 एप्रिलपासून नवीन व्हेज कोड येणार अन् मोठा फायदा होणार, PF दुप्पट होणार
(New wage code will not implement from 1st april No change in your salary structure for now)