नीरव मोदीला विशेष न्यायालयाचा दणका; 11 जूननंतर संपत्तीवर टाच येणार

| Updated on: May 13, 2021 | 7:18 PM

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी नीरव मोदीला नोटीस बजावली आहे. त्या नोटीशीनुसार नीरव मोदीला कोणत्याही परिस्थितीत न्यायालयापुढे प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. (Nirav Modi was slapped by the special court; The property will siezed after June 11th)

नीरव मोदीला विशेष न्यायालयाचा दणका; 11 जूननंतर संपत्तीवर टाच येणार
नीरव मोदीला विशेष न्यायालयाचा दणका
Follow us on

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा करून परदेशात धूम ठोकणारा कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात अखेर कारवाई सुरू होण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याला आज मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने त्याला नोटीस बजावली असून 11 जूनला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आपली संपत्ती जप्त का करू नये, अशी विचारणा करीत न्यायालयाने नीरव मोदीला नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणींत मोठी भर पडली आहे. (Nirav Modi was slapped by the special court; The property will siezed after June 11th)

न्यायालयापुढे हजर न राहिल्यास कठोर कारवाई

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी नीरव मोदीला नोटीस बजावली आहे. त्या नोटीशीनुसार नीरव मोदीला कोणत्याही परिस्थितीत न्यायालयापुढे प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. जर तो न्यायालयाच्या नोटीशीला अनुसरून न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाला नाही, तर त्याच्याविरोधात आर्थिक फरार गुन्हेगार कायद्यांतर्गत (एफईओ अ‍ॅक्ट) कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला जाईल, अशी सक्त ताकीदही विशेष न्यायाधीश बर्डे यांनी दिली आहे. याच न्यायालयाने डिसेंबर 2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर नीरव मोदीला आर्थिक फरार गुन्हेगार घोषित केले होते. एफईओ अ‍ॅक्टअन्वये आरोपीला आर्थिक फरार गुन्हेगार घोषित केले जाऊ शकते, जर त्याच्याविरोधात 100 कोटींहून अधिक पैशांच्या गैरव्यवहाराचा गुन्हा असेल किंवा तो देशात मागे परतण्यास तयार नसेल.

संपत्ती जप्त का करू नये? न्यायालयाचा सवाल

विशेष न्यायालयाने नीरव मोदीला त्याची संपत्ती जप्त का करू नये, असा सवाल नोटीशीद्वारे केला आहे. विशेष न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी पीएमएलए कायदा, 2002 आणि फ्युगिटीव्ह ईकॉनॉमिक ऑफेन्डर्स अ‍ॅक्ट 2018 या दोन कायद्यांतील तरतुदींन्वये नीरव मोदीला नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या याचिकेत नीरव मोदीच्या ज्या संपत्तीचा उल्लेख केला आहे, त्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात न्यायालयाने विचारणा केली आहे.

14 हजार कोटींचा घोटाळा

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 14 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतातून हा कोट्यवधींचा गैरव्यवहार केला होता. याप्रकरणी विशेष न्यायालयाने नीरव मोदीसह त्याची पत्नी एमी मोदी, बहिण पूर्वी आणि भावोजी मयंक मेहता यांनाही नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबईतील मॅजिस्ट्रेट न्यायालयाने मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंटचा आदेश दिला होता. नंतर जून 2018 मध्ये इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. त्यानंतर भारताने ऑगस्ट 2018 मध्ये ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. पुढे मार्च 2019 मध्ये नीरव मोदीला अटक झाली. (Nirav Modi was slapped by the special court; The property will siezed after June 11th)

इतर बातम्या

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान, जनहित याचिका दाखल

अवघ्या तीन महिन्यात एलन मस्कची पलटी, Tesla कंपनी Bitcoin मध्ये पेमेंट स्वीकारणार नाही, कारण…