Budget 2024 | आज ज्या आयपॅडवर FM निर्मला सीतारमण यांनी वाचून दाखवलं बजेट त्याची किंमत किती?

| Updated on: Feb 01, 2024 | 1:24 PM

Budget 2024 | निर्मला सीतारमण यांनी देशाच्या संसदेत 6 व्यां दा बजेट सादर केलं. कागदपत्र रहित बजेट सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याची सुरुवात 2022-23 च्या युनियन बजेटपासून केली होती.

Budget 2024 | आज ज्या आयपॅडवर FM निर्मला सीतारमण यांनी वाचून दाखवलं बजेट त्याची किंमत किती?
Budget 2024
Follow us on

FM Nirmala Sitharaman | लोकसभा निवडणुकीआधी आज गुरुवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2024 सादर केला. निर्मला सीतारमण यांचं हे 6 व बजेट आहे. याआधी त्यांनी 5 बजेट सादर केली आहेत. सरकारकडून अंतरिम बजेट निवडणुकीआधी सादर केलं जातं. यात निवडणुकीआधीच्या सरकारी खर्चाचा वृत्तांत असतो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण नेहमीप्रमाणे पांरपारिक शैलीत थैलीमध्ये लपेटून डिजिटल टॅबलेट घेऊन संसेदत पोहोचल्या. संसदेत तिसऱ्यांदा पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं. बजेट सादर करण्याआधी निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अर्थमंत्री सीतारमण यांनी कुठल्या आयपॅडच्या मदतीने हे बजेट सादर केलं, त्या बद्दल जाणून घेऊया.

पेपरलेस बजेट सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री आहेत. त्यांनी अशा प्रकारे बजेट सादर करण्याची सुरुवात 2022-23 च्या युनियन बजेटपासून केली होती. अर्थमंत्र्यांनी टॅबलेटच्या माध्यमातून बजेट सादर केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्यावर्षीप्रमाणे यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी Apple iPad (10th gen) ने बजेट सादर केलं.

कार्यालयाबाहेर फोटो

अर्थमंत्री सीतारमण ज्या टॅबमधून बजेट सादर करणार होत्या, तो लाल कपड्यात लपेटून त्या संसदेत पोहोचलेल्या. यावेळी त्यांनी निळ्या रंगाची साडी परिधान केलेली. राष्ट्रपतींना भेटण्याआधी अर्थमंत्र्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत आपल्या कार्यालयाबाहेर फोटो काढले.


किती आहे या iPad ची किंमत?

Apple ज्या आयपॅडद्वारे निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केलं, तो Apple iPad (10th gen) आहे. Apple च्या या आयपॅडची किंमत 39,900 रुपये आहे. यामध्ये 64GB स्टोरेज वेरिंएटची क्षमता आहे. याच आयपॅडच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,900 रुपये आहे.