नवी दिल्लीः मार्च 2020 मध्ये जेव्हा देशात कोरोना आला, तेव्हा संपूर्ण देशात दोन महिने लॉकडाऊन होते. त्यानंतरही फक्त अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानेच महिन्यांसाठी उघडण्याची परवानगी होती. यामुळे ज्वेलरी मार्केटवर वाईट परिणाम झाला. यादरम्यान देशात ऑनलाईन सोन्याची विक्री सुरू झाली आणि यामध्ये खरेदीदार 100 रुपयांचे सोनेदेखील खरेदी करू शकतो.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. आतापर्यंत सोने खरेदीचे काम किरकोळ दुकानांद्वारे केले जात आहे. कोरोनामुळे ऑनलाईन सोने खरेदी आणि विक्रीला चालना मिळाली आणि गुंतवणुकीचे मूल्य 100 रुपयांपेक्षा जास्त वाढले. पीसी ज्वेलर्स, कल्याण ज्वेलर्स, तनिष्क, सेन्को गोल्ड आणि डायमंड सारख्या ब्रॅण्ड्सने ऑनलाईन दागिन्यांची विक्री सुरू केली. यामध्ये खरेदीदार किमान 100 रुपयांचे सोने खरेदी करू शकतो. जेव्हा तो 1 ग्रॅम इतके सोने खरेदी करतो, तेव्हा तो त्याची डिलिव्हरी देखील घेऊ शकतो.
वरील सर्व ब्रँड्सनी त्यांच्या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करून दिलीय. याशिवाय ऑगमाँट गोल्ड फॉर ऑल, सेफ गोल्ड सारख्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन सोने खरेदी केले जाऊ शकते. आता आपल्या देशात उत्सवाचा हंगाम सुरू होत आहे. सणासुदीच्या काळात सोन्याला प्रचंड मागणी असते. नवीन ट्रेंडमध्ये ऑनलाईन सोन्याच्या खरेदीलाही गती मिळत आहे.
ब्लूमबर्गच्या एका अहवालात, कल्याण ज्वेलर्सचे रमेश कल्याण रमण यांनी सांगितले की, तरुणांमध्ये गुंतवणुकीबाबत खूप दक्षता घेण्यात आलीय. ऑनलाईन सोने खरेदी करणारे बहुतेक तरुण आहेत. ते दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोने विकत घेत आहेत. 2019 च्या अहवालानुसार, ज्वेलर्सच्या वेबसाईटच्या मदतीने ऑनलाईन ज्वेलरी मार्केट एकूण मार्केटच्या 2 टक्के आहे.
सेफ गोल्डचे वरुण माथूर म्हणाले की, लोक अधिक डिजिटल व्यवहार करत आहेत. लोकांना वाटते की सोन्याची किंमत आता कमी आहे आणि येत्या काही दिवसांत ती वाढेल. त्यामुळे ऑनलाईन सोन्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली. फेब्रुवारी 2020 पासून विक्रीत 200% वाढ झाली. असा विश्वास आहे की, या सणाच्या हंगामात ऑनलाईन सोने खरेदीमध्ये सुमारे 20-30 टक्के वाढ होईल.
संबंधित बातम्या
बनावट सिमद्वारे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, हे टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा